Kawasaki नं भारतात लाँच केली सुपरबाईक Ninja ZX-10R; पाहा जबरदस्त फीचर्स आणि किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 03:48 PM2021-03-17T15:48:48+5:302021-03-17T15:49:50+5:30

Kawasaki Ninja ZX-10R BS6: कंपनीनं भारतीय बाजारपेठेत लाँच केले Kawasaki Ninja ZX-10R चे दोन मॉडेल्स

2021 Kawasaki Ninja ZX10R launched in India at Rupees 14 99 lakh know features and more details | Kawasaki नं भारतात लाँच केली सुपरबाईक Ninja ZX-10R; पाहा जबरदस्त फीचर्स आणि किंमत

Kawasaki नं भारतात लाँच केली सुपरबाईक Ninja ZX-10R; पाहा जबरदस्त फीचर्स आणि किंमत

googlenewsNext
ठळक मुद्देकंपनीनं लाँच केले Kawasaki Ninja ZX-10R चे दोन मॉडेल्सबाईकमध्ये देण्यात आले अत्याधुनिक फीचर्स

जापानची दुचाकी उत्पादक कंपनी Kawasaki नं भारतीय बाजारपेठेत आपली नवी Ninja ZX-10R BS6 ही बाईक लाँच केली आहे. दोन मॉडेल्समध्ये ही बाईक पाहायला मिळणार आहेच. ही बाईक लाईम ग्रीन आणि फ्लॅट इबोनी या दोन रंगांमध्ये पाहायला मिळेल. 

कंपनीनं या बाईकमध्ये बीएस 6 इंजिनसह काही बदलही केले आहेत. यामुळे ही बाईक यापूर्वीच्या मॉडेल्सपेक्षा वेगळी झाली आहे. या बाईकमध्ये 998cc चं लिक्विड कुल्ड इन लाईन फोर सिलिंडर असलेल्या इंजिनचा वापर करण्यात आला आहे. हे इंजिन 200bhp ची पॉवर जनरेट करत. तर दुसरीकडे RAM Air सह इंजिन 210bhp ची पॉवर आणि 114Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. 

यासह बाईकचं डिझाईनदेखील अपडेट करण्यात आलं आहे. याला एअरो डायनॅमिक अपर काऊलसोबत विंग बेल्ट, अपडेटेड हँडलबार आणि फुटपेग पोझिशनही देण्यात आलं आहे. याशिवाय LED लायटिंगसोबत ब्ल्यूटूथ अनेबल्ड TFT कलर इंस्ट्रूमेंट क्लस्टर या बाईकला अधिक चांगलं बनवतात. 

इलेक्ट्रॉनिक्सबद्दल सांगायचं झालं तर यात इलेक्ट्रॉनिक क्रुझ कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, लाँच कंट्रोल, कॉर्निंग मॅनेजमेंट फंक्शन, पॉवर मोड्स, रायडिंग मोड्स, इंजिन ब्रेक कंट्रोल, एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टेअरिंग डँपर, बायडायरेक्शनल क्विक शिफ्टरसारखे फीचर्सही देण्यात आले आहे. भारतात या बाईकची एक्स शोरूम किंमत 14.99 लाख इतकी आहे. या बाईकचं वजन 207 किलो आहे.

Web Title: 2021 Kawasaki Ninja ZX10R launched in India at Rupees 14 99 lakh know features and more details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.