Audi च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील महिन्यात येणार नवीन एसयूव्ही; टीझर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 12:36 PM2022-08-09T12:36:11+5:302022-08-09T12:36:56+5:30
2022 Audi Q3 To Launch In September : बाजारात ऑडी Q3 ची स्पर्धा BMW X1, Mercedes-Benz GLA आणि Volvo XC40 सारख्या कारसोबत होणार आहे.
नवी दिल्ली : जर्मन कार निर्माता कंपनी ऑडीचे भारतीय कार बाजारावर बरेच फोकस करत आहे. ऑडी इंडियाने अलीकडेच ऑडी ए 8 एल (Audi A8 L) फेसलिफ्ट मॉडेल लाँच केले आहे. आता ऑल-न्यू Q3 लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. 2022 ऑडी Q3 चा कंपनीच्या सोशल मीडिया हँडलवरून अधिकृतपणे टीझर पोस्ट करणयात आला आहे.
पुढील महिन्यात (सप्टेंबर 2022) भारतात 2022 ऑडी Q3 लाँच होण्याची शक्यता आहे. नवीन जनरेशनच्या ऑडी Q3 ने 2019 मध्ये जागतिक पदार्पण केले. मात्र, ही कार भारतात लाँच होण्यास विलंब झाला आहे. पण, आता कंपनी भारतात लाँच करण्यासाठी सज्ज आहे. बाजारात ऑडी Q3 ची स्पर्धा BMW X1, Mercedes-Benz GLA आणि Volvo XC40 सारख्या कारसोबत होणार आहे.
नवीन ऑडी Q3 ची डिझाइन
नवीन ऑडी Q3 चे डिझाइन कंपनीच्या फ्लॅगशिप एसयूव्ही Q8 वरून प्रेरित आहे. समोरच्या बाजूला कारला आठ व्हर्टिकल क्रोम स्लॅट्ससह ऑक्टागन शेपची ग्रिल देण्यात आली आहे. या प्रीमियम एसयूव्हीला मॅट्रिक्स एलईडी हेडलॅम्प, मल्टी-स्पोक अलॉय व्हील्स, स्लोपिंग रूफलाइन आणि डीआरएलसह एलईडी टेल लॅम्प मिळतील.
नवीन जनरेशन ऑडी Q3 मध्ये 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 360-डिग्री पार्किंग कॅमेरा यासह अनेक शानदार फीचर्स मिळणार आहेत. कारच्या बूटमध्ये अॅडजस्टेबल फ्लोअर मिळेल. यात 675-लिटरचे लगेज स्पेस मिळू शकते, जी मागील सीट फोल्ड करून 1,526-लिटरपर्यंत वाढवता येते.
नवीन ऑडी Q3 चे इंजिन
इंडिया-स्पेक ऑडी Q3 मध्ये 2.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन असेल, जे फोक्सवॅगन टिगुआन आणि स्कोडा कोडिएकमध्ये देखील मिळते. हे इंजिन 187 बीएचपी पॉवर आणि 320 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. हे 7-स्पीड डीसीटीसह जोडले जाऊ शकते. इंटरनॅशनल-स्पेक ऑडी Q3 मध्ये 1.5L टर्बो पेट्रोल (150bhp), 2.0L टर्बो पेट्रोल आणि 2.0L टर्बो डिझेल इंजिन असे 3 इंजिन ऑप्शन देण्यात आले आहेत.