2022 Mahindra Bolero: बोलेरोच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; लवकरच येणार Mahindra Bolero चे नवीन मॉडेल, 'हे' फीचर्स मिळणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 02:50 PM2022-04-24T14:50:11+5:302022-04-24T14:50:45+5:30
2022 Mahindra Bolero: महिंद्रा लवकरच भारतीय बाजारात आपली नवीन Bolero लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
2022 Mahindra Bolero: भारतातील अग्रगण्य ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) याच महिन्यात लोकप्रिय बोलेरो(SUV 2022 Bolero) चे नवीन मॉडेल लॉन्च करण्याची शक्यता आहे. चाचणीदरम्यान अनेकदा या नवीन SUV ची झलक पाहायला मिळाली आहे. याशिवाय आता या नवीन मॉडेलचे सर्व फीचर्सदेखील समोर आले आहे. काही रिपोर्ट्सनुसार महिंद्रा बोलेरो फेसलिफ्ट (Mahindra Bolero Facelift)मध्ये फक्त कॉस्मॅटिक बदल केले जातील, पण तांत्रिकदृष्ट्या गाडी जैसे थे राहील. बोलेरोचे हे नवीन मॉडेल दोन नवीन रंगांच्या एक्सटीरियरमध्ये येणार आहे.
2022 बोलेरोमध्ये दोन एअरबॅग्स
कंपनीने या SUV सोबत नवीन फीचर्स अॅड केले आहेत. यात नवीन डॅशबोर्ड आणि अपहोल्स्ट्री मिळू शकते. याशिवाय अपग्रेडेड कॅबिनसह एबीएस, ईबीडी, पार्किंग सेंसर्स और स्पीड अलर्टसारख्ये फीचर्स असतील. तसेच, महिंद्राने यात दोन एअरबॅग्सदेखील दिले आहेत.
16.7 किमीचे मायलेज
2022 महिंद्रा बोलेरोमध्ये 1.5-लीटर डीझेल इंजिन असेल, जो 75 बीएचपी शक्ती आणि 210 एनएम पीक टॉर्क जनरेट करतो. या इंजिनसोबत 5-स्पीड मॅनुअल गिअरबॉक्स दिले आहे. एआरएआयनुसार एक लिटर डीझेलमध्ये ही 16.7 किमीपर्यंत चालेल. तीन सिलेंडर असल्यामुळे याच्या इंजिनला चांगली पॉवर आणि वेग मिळतो.
नवीन जनरेशन स्कॉर्पियोदेखील तयार
महिंद्रा 2022 बोलेरोसोबत नवीन जनरेशन स्कॉर्पियोवर काम करत आहे. लवकरच हीदेखील भारतीय बाजारात लॉन्च होऊ शकते. ही आधीच्या स्कॉर्पियोपेक्षा पूर्णपणे वेगळी असेल. शिवाय, ही जुन्या गाडीला रिप्लेस करणार नसून, दोन्ही गाड्या सोबतच विकल्या जातील.