Maruti Suzuki Brezza CNG लवकरच लॉन्च होऊ शकते, जाणून घ्या काय मिळू शकतात फीचर्स?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 04:47 PM2022-04-25T16:47:00+5:302022-04-25T16:47:52+5:30

Maruti Brezza CNG :  डिझाइनच्या बाबतीत, ब्रेझा फेसलिफ्ट अपडेटेड फ्रंट आणि रिअर प्रोफाइलसह अधिक आकर्षक दिसण्याची शक्यता आहे.

2022 maruti brezza cng launch soon check here features specs and more details | Maruti Suzuki Brezza CNG लवकरच लॉन्च होऊ शकते, जाणून घ्या काय मिळू शकतात फीचर्स?

Maruti Suzuki Brezza CNG लवकरच लॉन्च होऊ शकते, जाणून घ्या काय मिळू शकतात फीचर्स?

Next

नवी दिल्ली : मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडच्या  2022 ब्रेझा पेट्रोलसोबत ब्रेझा सीएनजी (Brezza CNG) लाँच करेल अशी अपेक्षा आहे. 2022 मारुती सुझुकी ब्रेझा व्हिटारा नाव वगळण्याची आणि अधिक फीचर्स व स्टाइलसह येईल, अशी शक्यता आहे. 2022 ब्रेझा आगामी Hyundai Venue facelift, Tata Nexon, Mahindra XUV300 आणि Kia Sonet सोबत स्पर्धा करेल.

2022 मारुती ब्रेझा नवीन Ertiga आणि XL6 वर दिसलेल्या 1.5L ड्युअल-जेट पेट्रोल इंजिन असण्याची शक्यता आहे. ही पॉवरट्रेन अर्टिगा सीएनजीमध्ये दिसल्याप्रमाणे त्याच सीएनजीकिटसह दिली जाईल. Ertiga CNG 5500rpm वर 87PS ची पॉवर आणि 4200rpm वर 121Nm टॉर्क जनरेट करते.सीएनजी ऑप्शन फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येतो तर पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देखील मिळू शकते. डिझाइनच्या बाबतीत, ब्रेझा फेसलिफ्ट अपडेटेड फ्रंट आणि रिअर प्रोफाइलसह अधिक आकर्षक दिसण्याची शक्यता आहे.

स्पाय शॉट्सच्या माहितीनुसार, नवीन ब्रेझाला स्लीक ट्विन-प्रोजेक्टर हेडलाइट्स, नवीन अलॉय व्हील आणि स्प्लिट एलईडी टेललाइट्स मिळतील. तसेच, पुढीच्या बाजूला ब्रेझाला स्लिमर क्रोम ग्रिल मिळणे अपेक्षित आहे, जे हेडलाइट्ससह एकत्रित केले जाते. मागील बाजूस, टेलगेटवर 'ब्रेझा' लिहिलेले मिळेल, अशी शक्यता आहे. आतील बाजूस, 2022 ब्रेझाला स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी लेटेस्ट फीचर्स मिळतील. हायलाइट करण्यायोग्य काही फिचर्समध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, हेड-अप डिस्प्ले, 360-डिग्री पार्किंग कॅमेरा, टेलिमॅटिक्ससह 9.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, पॅडल शिफ्टर्स आणि शार्क फिन अँटेना यांचा समावेश आहे.

संभाव्य लॉन्च टाइमलाइननुसार, 2022 ब्रेझा ही फॅक्टरी-फिट सीएनजी पॉवरट्रेन मिळवणारी पहिली सबकॉम्पॅक्ट SUV असू शकते. मात्र, Tata Motors आणि Kia India देखील Nexon CNG आणि Sonnet CNG लाँच करण्याच्या तयारीत आहेत. Nexon CNG आणि Sonnet CNG दोन्ही ब्रेझाच्या नॅच्युरली एस्पिरेटेड इंजिनच्या तुलनेत टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह दिले जातील.

Web Title: 2022 maruti brezza cng launch soon check here features specs and more details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.