2023 Hyundai Aura: 6 एअरबॅग आणि २८ पेक्षा अधिकचे मायलेज; ह्युंदाईची जबरदस्त सेदान कार येतेय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 09:11 AM2023-01-10T09:11:29+5:302023-01-10T09:11:52+5:30
किंमतीची घोषणा ही या आठवड्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. याचबरोबर ग्रँड आय १० निऑस फेसलिफ्ट व्हेरिअंटदेखील सादर करण्यात आली आहे.
ह्युंदाई मोटर्सने सोमवारी नवीन जनरेशनच्या ऑरा सब कॉम्पॅक्ट सेदानला अनवील केले. याचे फिचर्स, पावरट्रेन आणि टेक्नॉलॉजीमध्ये अनेक अपडेट करण्यात आले आहेत. ऑराच्या अधिकृत बुकिंगलाही सुरुवात झाली आहे. ग्रेटर नोएडामध्ये होणाऱ्या ऑटो एक्स्पोमध्ये ही कार लाँच केली जाणार आहे. २०१९ मध्ये ही कार लाँच करण्यात आली होती. २०२३ ची ही पहिली अपडेट आहे.
Hyundai Aura फेसलिफ्ट ११ हजार रुपयांत बुक करू शकता. किंमतीची घोषणा ही या आठवड्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. याचबरोबर ग्रँड आय १० निऑस फेसलिफ्ट व्हेरिअंटदेखील सादर करण्यात आला आहे. याचीही लाँचिंग ऑटो एक्स्पोमध्ये होणार आहे.
2023 Hyundai Aura मध्ये ऑटो हेडलँप्स, नवीन १५ इंचाचे अलॉय व्हील्स, ट्वीक्ड फ्रंट बंपर, पेंटेड ब्लॅक रेडिएटर ग्रीलसह डीआरएलचे नवीन सेट डिझाईन दिसणार आहे. ह्युंदाई ही कार सहा रंगांत आणेल, यामध्ये स्टारी नाईट हा नवीन रंगही असेल.
2023 Aura च्या केबिनमध्ये देखील मोठी अपडेट आहे. 3.5 इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले, Apple CarPlay आणि Android Auto सोबत 8-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस चार्जिंग, USB-C टाइप चार्जिंग पोर्ट, फुटवेल लाइटिंगसोबत येते.
कंपनीने चार ऐवजी सहा एअरबॅग देण्याची खेळी खेळली आहे. ही कार चार आमि सहा एअरबॅगमध्ये येईल. बर्गलर अलार्म, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ईएससी), व्हेईकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट, हिल असिस्ट कंट्रोल आणि क्रूज कंट्रोल देण्यात येणार आहे. इंजिन मात्र तेच १.२-लीटर कप्पा पेट्रोल देण्यात येणार आहे.