Ather च्या इलेक्ट्रिक स्कूटर्स महागल्या, रेंज वाढवण्यासोबतच किंमतीतही वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 14:36 IST2025-01-05T14:31:42+5:302025-01-05T14:36:17+5:30

Ather : एथर 450S ची किंमत 1.30 लाख रुपयांपासून सुरू होते.

2025 Ather 450 X, 450 S, 450 Apex launched in India: Here's what's new | Ather च्या इलेक्ट्रिक स्कूटर्स महागल्या, रेंज वाढवण्यासोबतच किंमतीतही वाढ!

Ather च्या इलेक्ट्रिक स्कूटर्स महागल्या, रेंज वाढवण्यासोबतच किंमतीतही वाढ!

एथरने (Ather) इलेक्ट्रिक स्कूटरची 450 रेंज अपडेट केली आहे. स्कूटरमध्ये नवीन फीचर्स जोडण्याबरोबरच, एथरने या ईव्हीच्या रेंजमध्येही सुधारणा केली आहे. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अपडेट झाल्यानंतर ईव्हीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. 

एथर 450S ची किंमत 1.30 लाख रुपयांपासून सुरू होते. तर मिड व्हेरिएंट 450X 2.9 ची किंमत 1.47 लाख रुपये आणि 450X 3.7 ची किंमत 1.57 लाख रुपये करण्यात आली आहे.

एथर 450S ची किंमत 4,400 रुपयांनी वाढली आहे. या स्कूटरमध्ये थोडा फास्ट चार्जिंग 375W चार्जर मिळत आहे. मागील मॉडेलमध्ये 350W युनिट चार्जर उपलब्ध होता. एथर ई-स्कूटरमधील प्रो पॅकमध्ये अनेक फीचर्स समाविष्ट करण्यात आली आहेत.

एथर 450X च्या दोन्ही वेरिएंटमध्ये मॅजिक ट्विस्ट आणि ट्रॅक्शन कंट्रोलची फीचर आहेत. यासोबतच या ईव्हीमध्ये दोन नवीन कलर ऑप्शन्स देखील जोडण्यात आले आहेत. एथर 450X 2.9 ची किंमत सर्वाधिक वाढली आहे. या ईव्हीच्या किमतीत 6,400 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. पण, एथरची ही स्कूटर आता 700 kW चा चार्जर मिळत आहे, ज्यामुळे स्कूटरचा चार्जिंग टाइम निम्मा होईल.

एथर 450X 3.7 ची किंमत दोन हजार रुपयांनी वाढली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये नवीन फीचर्स आणि कलर व्हेरिएंटचाही समावेश केला जाऊ शकतो. या ईव्हीमध्ये मॅजिक ट्विस्टचे low आणि High असे दोन लेव्हल मिळतात. तर 450X 2.9 मध्ये फक्त ते ऑन किंवा ऑफ केले जाऊ शकते.

एथर स्कूटरला नवीन कलर
एथर  450 X  हायपर सँड कलर व्हेरिएंटसोबत आहे. दुसरीकडे, एथर 450S मध्ये हायपर सँडसोबत स्टील ब्लू कलर देखील देण्यात आला आहे. एथरच्या या स्कूटर्सना बाजारात मोठी मागणी आहे. 

Web Title: 2025 Ather 450 X, 450 S, 450 Apex launched in India: Here's what's new

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.