६ एअरबॅग्ज आणि ADAS सेफ्टी फीचर्स... ३१ जानेवारीनंतर Honda Amaze ची किंमत वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 13:30 IST2025-01-22T13:29:08+5:302025-01-22T13:30:02+5:30
Honda Amaze : जर तुम्हालाही ही कार खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे.

६ एअरबॅग्ज आणि ADAS सेफ्टी फीचर्स... ३१ जानेवारीनंतर Honda Amaze ची किंमत वाढणार?
नवी दिल्ली : गेल्या महिन्यात होंडा कंपनीने ग्राहकांसाठी अमेझचे (Amaze) फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केले होते. ८ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसह हे मॉडेल लाँच करण्यात आले होते. मात्र, आता या मॉडेलची किंमत लवकरच वाढली जाणार आहे. कंपनीने सुरुवातीची किंमत असलेली ऑफर ३१ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. पण, आता ही ऑफर लवकरच संपणार आहे.
जर तुम्हालाही ही कार खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे. होंडा अमेझची किंमत ३१ जानेवारीनंतर वाढू शकते. कारण कंपनी सुरुवातीच्या किंमतीत बदल करू शकते. या कॉम्पॅक्ट सेडानचे तीन व्हेरिएंट्स लाँच करण्यात आले असून यामध्ये ६ कलर ऑप्शन देण्यात आले आहेत.
काय आहेत फीचर्स?
या कॉम्पॅक्ट सेडानमध्ये ८ इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेला सपोर्ट करते. याशिवाय, या कारमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ७ इंचाचा टीएफटी ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस फोन चार्जर, ६ स्पीकर ऑडिओ सिस्टम आणि यूएसबी चार्जिंग पोर्ट देण्यात आले आहेत. तसेच, या कारमध्ये ४१६ लिटर बूट स्पेस देण्यात आली आहे. जेणेकरून तुम्ही तुमचे बरेच सामान कारच्या डिग्गीमध्ये ठेवू शकता.
या कारमध्ये लेव्हल २ एडीएएस फीचर्स जसे की, लेन कीप असिस्ट, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, रोड डिपार्चर मीटिंग असे अनेक सेफ्टी फीचर्स आहेत. या कारमध्ये लेनवॉच कॅमेरा, ६ एअरबॅग्ज, व्हेईकल स्टॅबिलिटी असिस्ट, हिल स्टार्ट असिस्ट, रियर पार्किंग सेन्सरसह मल्टी-अँगल रिअर पार्किंग कॅमेरा, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ISOFIX सपोर्ट आणि इमर्जन्सी स्टॉप सिग्नल, असे काही फर्स्ट इन सेगमेंट फीचर्स देण्यात आले आहेत.
इंजिन डिटेल्स
होंडा अमेझमध्ये १.२ लिटर नॅचरली एस्पिरेटेड iVtec पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे ८९ बीएचपी पॉवर आणि ११० एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच, ही कार तुम्हाला ५ स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह मिळणार आहे. याशिवाय, कंपनीच्या मते, या कारचे मॅन्युअल व्हेरिएंट प्रति लिटर १८.६५ किमी पर्यंत मायलेज देते तर ऑटोमॅटिक व्हेरिएंट १९.४६ किमी पर्यंत मायलेज देते.