४ डेज टू गो...! टेस्लाला टक्कर देणारी Vinfast भारतात एन्ट्रीसाठी तयार; टीझर जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 18:33 IST2025-01-13T18:33:35+5:302025-01-13T18:33:49+5:30
विनफास्ट भारतात येत्या काही दिवसांत कार लाँच करणार आहे. ईलेक्ट्रीक वाहनांच्या दुनियेतील चांगले नाव कमविलेली ही कंपनी भारतीय बाजारात वाहनांच्या किंमती किती ठेवते यावर सारे गणित अवलंबून असणार आहे.

४ डेज टू गो...! टेस्लाला टक्कर देणारी Vinfast भारतात एन्ट्रीसाठी तयार; टीझर जारी
व्हिएतनामची कंपनी आणि अमेरिकेच्या टेस्लाला टक्कर देणारी विनफास्टने भारतात येण्यासाठी काऊंट डाऊन सुरु केला आहे. दिल्लीत होणाऱ्या ऑटो एक्स्पोमध्ये विनफास्ट आपल्या कारचे प्रदर्शन भरविणार आहे. एक्स्पोला अवघे काही दिवस शिल्लक असताना विनफास्टने आपल्या कारचा व्हिडीओ टीझर जारी केली आहे.
विनफास्ट भारतात येत्या काही दिवसांत कार लाँच करणार आहे. ईलेक्ट्रीक वाहनांच्या दुनियेतील चांगले नाव कमविलेली ही कंपनी भारतीय बाजारात वाहनांच्या किंमती किती ठेवते यावर सारे गणित अवलंबून असणार आहे.
विनफास्टने जारी केलेला टीझर हा Vinfast VF7 कारचा आहे. यामध्ये गाडीचा पुढील लुक आणि काही फिचर्स दाखविण्यात आले आहेत. तसेच ही एसयुव्ही आहे. ही कार सात सीटर असणार आहे. विनफास्ट भारतीय बाजारात दोन कार उतरविणार आहे. यामध्ये पाच सीटर आणि सात सीटर कार असणार आहे.
चांगली फिचर्स सोबत चांगली रेंजही देण्यात येण्याची शक्यता आहे. भारतात सध्या सरासरी साडेतीनशे-चारशेच्या रेंज देणाऱ्या गाड्या आहेत. ऑटो एक्स्पोमध्ये या कार लाँच होणार आहेत. कंपनीने अद्याप शोरुम किती, सर्व्हिस सेंटर कुठे कुठे असणार आदीची माहिती दिलेली नाही. लाँचिंगवेळीच किंमतही जाहीर केली जाणार आहे. तसेच बुकिंगही तेव्हापासूनच सुरु केले जाण्याची शक्यता आहे.