मोटरसायकलस्वाराला झाला ४१ हजारांचा दंड, अनावधानानंही करू नका तुम्ही ही चूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 12:42 PM2022-08-06T12:42:12+5:302022-08-06T12:42:52+5:30

ट्रॅफिक पोलिसांनी मोटरसायकल चालक आणि तिच्या मालकाला ४१ हजार रूपयांचा दंड भरावा लागला. दरम्यान, ट्रॅफिक नियमांचं पालन करणं आवश्यक आहे.

41000 rs traffic challan bjp mp manoj tiwari new rules traffic police licence puc bike papers delhi police | मोटरसायकलस्वाराला झाला ४१ हजारांचा दंड, अनावधानानंही करू नका तुम्ही ही चूक

मोटरसायकलस्वाराला झाला ४१ हजारांचा दंड, अनावधानानंही करू नका तुम्ही ही चूक

Next

वाहतूक पोलिसांनी मोटारसायकल चालक आणि त्याच्या मालकाला तब्बल ४१,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. दिल्लीतून ही घटना समोर आली आहे. अशी घटना तुमच्यासोबतही होऊ शकते. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. दिल्लीत भाजप खासदार मनोज तिवारी यांना हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे महागात पडले आहे. दिल्ली पोलिसांनी खासदार आणि वाहन मालकाला एकूण ४१ हजार रुपयांचा दंड ठोठावला. मनोज तिवारी यांना २१ हजार रुपयांचा दंड भरावा लागला आणि त्यानंतर वाहन मालकाला २२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

दिल्लीत काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेदरम्यान मनोज तिवारी ज्या बाईकवरून जात होते, त्यावर उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट नव्हती. तसंच त्या बाईकते पीयूसी प्रमाणपत्रही अपडेट केलेले नव्हते. या त्रुटींमुळे मोठ्या प्रमाणात त्यांना दंड ठोठावण्यात आला. व्यक्ती कितीही मोठी असला तरी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास त्शिक्षा भोगावीच लागते याचे हे अगदी अलीकडचे उदाहरण आहे.

“आम्ही हेल्मेट, लायसन्स, पीयुसी आणि हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) चे उल्लंघन केल्याबद्दल चालकाला दंड ठोठावला आहे. या दंडाची रक्कम 21,000 रुपये आहे. तर वाहन मालकाकडे पीयुसी आणि सिक्युरिटी नंबर प्लेट नसल्याबद्दल 20 हजार रुपयांचे दंड ठोठावण्यात आला आहे,” अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्या सुमन नलवा यांनी दिली.

काय म्हणाले तिवारी?
हेलमेट परिधान न केल्यामुळे मला खेद आहे. मी दंडाची रक्कम भरणार आहे. फोटोमध्ये वाहनाची नंबरप्लेट स्पष्टपणे दिसत आहे आणि लाल किल्ल्याच्या जवळ हे स्थान आहे. तुम्ही विना हेल्मेट बाईक चालवू नका. तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाला तुमची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया मनोज तिवारी यांनी दिली.

Web Title: 41000 rs traffic challan bjp mp manoj tiwari new rules traffic police licence puc bike papers delhi police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.