एका चार्जमध्ये 480 किमी रेंज; Hyundai Ioniq 5 लाँच, जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 02:55 PM2021-02-25T14:55:55+5:302021-02-25T14:59:25+5:30

Hyundai Ioniq 5 : ह्युंदाईच्या Ioniq 5 कारने कोना ईव्हीला मागे टाकले आहे. कोना इलेक्ट्रीक या आधी सर्वाधिक रेंज देणारी कार होती.

480 km range in a single charge; Hyundai Ioniq 5 Launched, find out the price | एका चार्जमध्ये 480 किमी रेंज; Hyundai Ioniq 5 लाँच, जाणून घ्या किंमत

एका चार्जमध्ये 480 किमी रेंज; Hyundai Ioniq 5 लाँच, जाणून घ्या किंमत

googlenewsNext

दक्षिण कोरियाची अग्रेसर वाहन निर्माता कंपनी ह्युंदाई मोटर्सने मंगळवारी Ioniq 5 मिड-साइज क्रॉसओवर लाँच केली आहे. ही कार पेट्रोल, डिझेलवर चालणारी नसून ती विजेवर चालणारी आहे.  कंपनीलाही या कारपासून मोठी अपेक्षा आहे. या कारमुळे कंपनी 2025 पर्यंत EV कंपन्यांच्या यादीत जगातील तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता आहे. (Hyundai IONIQ 5 Electric Car Debuts With 470 Kms Range)


Hyundai Motor ने सांगितले की, Ioniq 5 ला कंपनीने नवीन इलेक्ट्रिक वाहनांच्या प्लॅटफ़ॉर्मवर तयार केले आहे. हा प्लॅटफॉर्म स्वत:च्याच बॅटरी मॉड्यूल तंत्रज्ञानाचा वापर करतो, तसेच सध्याच्या कंपनीच्या अन्य ईव्ही कारपेक्षा कमी सुटे भाग वापरता येतात. यामुळे कमी उत्पादन खर्च आणि वेगाने उत्पादन करता येणार आहे. 
Ioniq 5 च्या लाँचिंगनंतर Hyundai ला जागतिक ईव्ही बाजारात 10 टक्के हिस्सेदारी मिळवायचे आहे. 2020 मध्ये ह्युंदाई आणि कियासाठी हा आकडा 7.2% टक्के आहे. 2020 मध्ये या दोन्ही कंपन्यांनी मिळून 1 दशलक्ष ईलेक्ट्रीक वाहनांची विक्री केली आहे. 


एकदा चार्ज केली की ह्युदाईची आयोनिक 5 ही कार 480 kms चे अंतर तोडते. जे ह्युंदाईच्याच कोना ईव्हीपेक्षा 20 टक्के जास्त आहे. कोना इलेक्ट्रीक या आधी सर्वाधिक रेंज देणारी कार होती. Ioniq 5 ही कार सध्या दोन बॅटरी पर्यायात मिळणार आहे. 58-(kWh) आणि 72.6 kWh असे हे दोन पर्याय आहेत. 2021 च्या पहिल्या सहामाहीत ही कार रस्त्यावर दिसू लागणार असून काही निवडक विभागांत ही कार विकली जाणार आहे. 


सध्यातरी भारतात ईव्हीने जोर पकडलेला नसल्याने ती युरोपमध्ये विकली जाणार आहे. तसेच या कारची किंमत युरोपमधील सरकारी प्रोत्साहन वगळून 51,100 डॉलरपासून सुरु होणार असल्याचे संकेत ह्युंदाई मोटर यूरोपचे अध्यक्ष मायकल कोल यांनी दिले आहेत. ह्युंदाईचा लक्झरियस ब्रँड Genesis च्या कारमधील स्टीअरिंग व्हील व अन्य इंटेरिअर वापरण्यात आले आहे. 

Hyundai धमाका करणार; नव्या सात सीटर एसयुव्ही Alcazar ची घोषणा

दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी ह्युंदाईच्या सर्वाधिक खपाच्या क्रेटा एसयुव्हीचे 7 सीटर व्हर्जन येणार असल्याची गेल्य़ा काही काळापासून चर्चा सुरु होती. याच्या मॉडेलच्या नावावरून देखील चर्चा होत होती. आता कंपनीने हे नाव जाहीर केले आहे. Hyundai Alcazar असे नाव देण्यात आले असून लवकरच ही सात सीटर एसयुव्ही लाँच केली जाणार आहे. 

Web Title: 480 km range in a single charge; Hyundai Ioniq 5 Launched, find out the price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.