राज्यातील ५१ हजार वाहनांचा विमा नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 06:22 AM2020-02-09T06:22:50+5:302020-02-09T06:23:18+5:30
वर्षभरातील आकडेवारी । परवाना रद्द करा, महामार्ग पोलिसांची शिफारस
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात गेल्या वर्षी ५१ हजार वाहनांनी विमा उतरविला नसल्याचे समोर आले आहे. यापैकी ५१ हजार वाहनांचा परवाना रद्द करावा, अशी शिफारस महामार्ग पोलिसांनी आरटीओ विभागाला केली आहे.
महामार्ग पोलिसांनी २०१९ मध्ये केलेल्या कारवाईत विमा न काढलेली ९,२४,१७० वाहने आढळली होती. परंतु पोलिसांनी समज दिल्यानंतर ८७३०४६ वाहनांनी विमा काढला परंतु सूचना देऊनही विमा न काढणाऱ्या ५११२४ वाहनांचा विमा रद्द करण्यात आला आहे.
२०१९ मध्ये केलेल्या कारवाईत राज्यात गेल्या वर्षी ५१ हजार वाहनांनी विमा उतरविला नसल्याचे उघडकीस आले. यामध्ये ५१ हजार वाहनांचा परवाना रद्द करावा अशी शिफारस महामार्ग पोलिसांनी आरटीओ विभागाला केला. थर्ड पार्टी विमा न उतरवणारी १८,६०५ वाहने आढळली. यापैकी ७,६६१ वाहने ताब्यात घेतली. वाहने ताब्यात घेतल्यानंतर ७,५८२ वाहनांनी विमा उतरविल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.
अपघातात बळी वा जखमी झालेल्यांच्या वारसदारांकडून मागण्यात येणाºया नुकसानभरपाईस मर्यादा नाही. वय, उत्पन्न, मृत व्यक्तीवर अवलंबून असलेले कुटुंब आणि घडलेल्या अपघाताचे स्वरूप यावर नुकसानभरपाई अवलंबून असते. वाहनांचे रजिस्ट्रेशन झाल्यापासून जशी वर्षे पुढे
जातात तसे वाहनाचे मूल्य कमी होत जाते. काही वर्षांनंतर वाहन विमा उतरवता येत नाही. त्यामुळे वेळीच विमा काढण्याचे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात येत आहे.
वाहन विमा
कशासाठी?
कार, ट्रक, मोटारसायकल व इतर वाहनांच्या संरक्षणासाठी वाहन विमा असतो. या विम्याचा प्राथमिक उद्देश हा रहदारीच्या अपघातांपासून होणारे वाहनाचे नुकसान, तसेच वाहनचालकाला अपघात झाल्यास सुरक्षा पुरवणे हा आहे.