Maruti Suzuki: मारुतीच्या 'या' स्वस्तातल्या कारवर मिळतोय 52 हजारांचा बम्पर डिस्काउंट, CNG मॉडेलवरही मिळतेय मोठी सूट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 05:46 PM2022-12-11T17:46:54+5:302022-12-11T17:47:38+5:30
मारुती सुझुकीने याच वर्षी अपडेटेड Alto K10 लॉन्च केली आहे. आता या कारमध्ये Celerio प्रमाणेच आणखी एक नवे डिझाइन मिळते. याशिवाय, आता या कारमध्ये अनेक आधुनिक फीचर्सदेखील उपलब्ध आहेत.
नवी दिल्ली - मारुती सुझुकी आपली नव्या पिढीची कार ऑल्टो K10 वर या महिन्यात तब्बल 52,000 रुपयांपर्यंतची सूट देत आहे. यात 30,000 रुपयांपर्यंतची रोख सूट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांपर्यंतची कॉर्पोरेट सूट, यांसारख्या फायद्यांचा समावेश आहे. तसेच कारच्या ऑटोमॅटिक व्हेरिअंटवर 22,000 रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. तसेच सीएनजी व्हेरिअंटवर 45,100 रुपयांपर्यंतची बम्पर सूट देण्यात येत आहे.
मारुती सुझुकीने याच वर्षी अपडेटेड Alto K10 लॉन्च केली आहे. आता या कारमध्ये Celerio प्रमाणेच आणखी एक नवे डिझाइन मिळते. याशिवाय, आता या कारमध्ये अनेक आधुनिक फीचर्सदेखील उपलब्ध आहेत.
देण्यात आले आहेत अनेक मॉडर्न फीचर्स -
ऑल-न्यू ऑल्टो K10 मध्ये 7 इंचाचा स्मार्टप्ले स्टूडिओ इंफोटेनमेन्ट सिस्टिम देण्यात आली आहे. जी Android Auto आणि Apple CarPlay दोहोंसोबत एका ताज्या डॅशबोर्ड, इंस्ट्रूमेन्ट क्लस्टर आणि स्टिअरिंग व्हीलसह येते. या कारमध्ये सुरक्षिततेसाठी डुअल फ्रंट एअरबॅग, रिव्हर्स पार्किंग सेंसर आणि ईबीडीसह एबीएस सारखे फीटर्सदेखील देण्यात आले आहे.
जाणून घ्या कारची किंमत -
नवी हॅचबॅक चार व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. हिच्या बेस एसटीडीची किंमत 3.99 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरू होते. LXi ची सुरुवातीची किंमत 4.82 लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी आहे. VXi ची किंमत 4.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आणि टॉप मॉडेल VXi+ ची किंमत 5.35 लाख रुपये (एक्स-शोरूम आहे. ऑल्टो k10 सॉलिड व्हाइट, सिल्की सिल्वर, ग्रेनाइट ग्रे, सिझलिंग रेड, स्पीडी ब्लू आणि अर्थ गोल्ड अशा सहा कलर मध्ये लॉन्च करण्यात आली आहे.