५६ हजार ऑर्डर पेडिंग आणि ९ महिन्यांचं वेटिंग, तरीही ‘या’ कारची लोकांमध्ये मोठी क्रेझ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 07:20 PM2022-12-06T19:20:50+5:302022-12-06T19:23:44+5:30

या कारला मिळतंय नॉन स्टॉप बुकिंग, पाहा काय आहे यात खास.

56 thousand order pending and 9 months of waiting still there is a big craze for this car maruti suzuki grand vitara | ५६ हजार ऑर्डर पेडिंग आणि ९ महिन्यांचं वेटिंग, तरीही ‘या’ कारची लोकांमध्ये मोठी क्रेझ

५६ हजार ऑर्डर पेडिंग आणि ९ महिन्यांचं वेटिंग, तरीही ‘या’ कारची लोकांमध्ये मोठी क्रेझ

Next

मारुती सुझुकी आता एसयूव्ही सेगमेंटमध्ये मजबूत होत आहे. कंपनीकडे New Brezza आणि Grand Vitara या दोन कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहेत. कंपनीच्या या दोन्ही कार्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र ग्रँड विटाराला लोकांची अधिक पसंती मिळत आहे. मारुतीने 26 सप्टेंबर रोजी अधिकृतरित्या ही कार लाँच केली होती. आश्चर्याची बाब म्हणजे एवढा कालावधी लोटूनही त्याचे बुकिंग संपण्याचे नाव घेत नाही. आतापर्यंत या कारच्या 56 हजारांहून अधिक ऑर्डर प्रलंबित आहेत. अशातही तुम्ही जर ग्रँड विटारा घेण्याच्या विचारात असाल तर पेंडिंग ऑर्डरसह तुम्हाला 9 महिन्यांच्या वेटिंगचाही विचार करावा लागणार आहे.

मारुती ग्रँड विटाराची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10.45 लाख ते 19.65 लाख रुपये आहे. भारतीय बाजारपेठेत त्याची स्पर्धा या कारची स्पर्धा ह्युंदाई क्रेटा, एमजी एस्टर, स्कोडा कुशाक आणि फॉक्सवॅगन टायगुन या कार्सशी आहे. ग्रँड विटारा टोयोटा मोटर कॉर्पोरेशन आणि सुझुकी मोटर कॉर्पोरेशनच्या ग्लोबल अलायन्सच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेत टोयोटाने या प्लॅटफॉर्मवर आपली अर्बन क्रूझर हायराईडर तयार केली आहे. ग्रँड विटारा आणि अर्बन क्रूझर हायराईड या दोन्ही कार्सचं उत्पादन बिदादी प्लांटमध्ये करण्यात येत आहे.

ग्रँड विटारा स्पेसिफिकेशन्स
मारुती सुझुकी आणि टोयोटा या दोन्ही कंपन्यांनी संयुक्तपणे Hyrider आणि Grand Vitara विकसित केली आहे. Hyrider प्रमाणेच ग्रँड विटारात माईल्ड हायब्रिड पॉवरट्रेन देण्यात आले आहे. या कारमध्ये 1462cc K15 इंजिन देण्यात आले आहे जे 6,000 RPM वर सुमारे 100 bhp पॉवर आणि 4400 RPM वर 135 Nm टॉर्क जनरेट करते. या शिवाय कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो. आपल्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक मायलेज देणारी ही कार आहे.

किती आहे मायलेज

स्ट्राँग हायब्रिड e-CVT- 27.97kmpl

माइल्ड हायब्रिड 5-स्पीड MT - 21.11kmpl

माइल्ड हायब्रिड 6-स्पीड AT - 20.58kmpl

माइल्ड हायब्रिड 5-स्पीड MT ऑल ग्रिप 19.38kmpl

Web Title: 56 thousand order pending and 9 months of waiting still there is a big craze for this car maruti suzuki grand vitara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.