700km ची रेंज, या इलेक्ट्रिक कारसमोर टेस्लाही फेल; 8 दिवसांत भारत होणार लॉन्च
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 12:49 PM2023-01-05T12:49:18+5:302023-01-05T12:50:00+5:30
सिंगल चार्जवर हिची रेंज 700km पर्यंत आहे, असा दावा कंपनीने केला आहे.
चिनी कंपनी BYD (Build Your Dreams) ऑटो एक्सपो 2023 मध्ये मोठा धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहे. या कंपनीने भारतीय बाजारात यापूर्वीच आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. आता 13 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या इव्हेंटमध्ये ही कंपनी काही नवे मॉडेल्स देखील शोकेस करणार आहे. यात BYD सील (Seal) सेडानचाही समावेश आहे. ही कार सादर करण्याची ही पहिलीच वेळ असेल. ही कार भारता शिवाय इतर काही देशांत लॉन्च करण्यात आली आहे. युरोपात आणि चीनमध्ये हीचा थेट टेस्ला मॉडेल-3 सोबत हीचा सामना होत आहे. हिचे डिझाईन ओशनने इन्सपायर्ड आहे. सिंगल चार्जवर हिची रेंज 700km पर्यंत आहे, असा दावा कंपनीने केला आहे.
BYD सीलचा बॅटरी पॅक आणि रेंज -
BYD ने आपल्या या इलेक्ट्रिक सेडान सीलमध्येही ब्लेड बॅटरी टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. या कारमध्ये दोन बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला आहे. यात पहिले इंजिन 61.4kWh युनिट आणि दुसरे इंजिन 82.5kWh युनिट पॅक असेल. 61.4kWh युनिट बॅटरी पॅकमुळे कारलाची रेंज 550km असेल. तसेच, 82.5kWh युनिट पॅक सह कारची रेंज 700km पर्यंत असेल. एवढेच नाही तर कंपनी या कारसोबत 110kW ते 150kW पर्यंतचे बॅटरी ऑप्शनही देऊ शकते. यात डुअल मोटर सेटअपही देण्यात आले आहे. ही कार केवळ 3.8 सेकेंदांत 0-100kmphची स्पीड घेते, असे कंपनीचे म्हणणे आहे.
BYD सीलचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशंस -
BYD सीलमध्येही सेंटर कंसोलमध्ये रोटेटिंग, 15.6-इंचांचा इंफोटेनमेंट डिस्प्लेही मिळतो. यात ड्रायव्हरला 10.25-इंचाचा डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि हेड-अप डिस्प्लेही मिळेल. फ्लोटिंग टचस्क्रीनला सेंट्रल AC व्हेंट्सद्वारे ड्राइव्ह सेलेक्टर आणि स्क्रॉल व्हीलसह खालच्या बाजूस विविध ड्राइव्ह मोड्स निवडण्यासाठी फ्लँक करण्यात आले आहे. सेंटर कंसोलमध्ये हिटेड विंडस्क्रीन, ऑडियो सिस्टिमसाठी व्हॉल्यूम कंट्रोलसह दोन वायरलेस चार्जिंग पॅड सारखे अॅडव्हॉन्स फीचर्स देखील मिळू शकतात.
याशिवाय, कूपसारखे ऑल ग्लास रुफ, फ्लश फिटिंग डोअर हँडल, चार बूमरँग शेप्ड LED डे-टाइम रनिंग लाइट्स, स्प्लिट हेडलॅम्प डिझाइन आणि रिअरमध्ये एक पुर्णपणे रुंद LED लाईट बार मिळेल. असे अनेक फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहेत. या कारच्या किंमतीसंदर्भात कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, हिची एक्स-शोरूम किंमत 60 लाख रुपयांच्या जवळपास असेल, असे मानले जात आहे.