8 Seater Car: का घ्यावी ५ किंवा ७ सीटर कार, जेव्हा १३ लाखांत मिळतेय ८ सीटर; पाहा लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 11:16 AM2023-01-25T11:16:10+5:302023-01-25T11:16:34+5:30

भारतीय बाजारपेठेत SUV कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. एसयूव्ही कारमुळे कंपनीच्या स्वस्त गाड्यांच्या विक्रीतही घट होत आहे.

8 Seater Car Why buy a 5 or 7 seater car when you can get an 8 seater for 13 lakhs See the list | 8 Seater Car: का घ्यावी ५ किंवा ७ सीटर कार, जेव्हा १३ लाखांत मिळतेय ८ सीटर; पाहा लिस्ट

8 Seater Car: का घ्यावी ५ किंवा ७ सीटर कार, जेव्हा १३ लाखांत मिळतेय ८ सीटर; पाहा लिस्ट

Next

भारतीय बाजारपेठेत SUV कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. एसयूव्ही कारमुळे कंपनीच्या स्वस्त गाड्यांच्या विक्रीतही घट होत आहे. तथापि, जर कोणतीही वाहने एसयूव्ही सेगमेंटला स्पर्धा देत असतील तर ती एमपीव्ही आहेत. एमपीव्ही कारची खास गोष्ट म्हणजे तुमचे मोठे कुटुंबही त्यात सहजरित्या प्रवास करू शकते. याशिवाय, तुम्ही त्यांचा व्यावसायिक वापर करू शकता.

देशातील मोठ्या प्रमाणात लोक सेव्हेन सीटर वाहनांच्या शोधात आहेत. आम्ही तुमच्यासाठी अशा 8 सीटर कारची यादी आणली आहे ज्यांची किंमत फक्त 13 लाख रुपयांपासून सुरू होते. यामध्ये महिंद्रा ते टोयोटापर्यंतच्या कंपन्यांचा समावेश आहे.

Mahindra Marazzo: या यादीत सर्वात स्वस्त कार महिंद्रा मराझो आहे. ही कंपनीची एमपीव्ही कार आहे जी बर्‍यापैकी फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. खास गोष्ट म्हणजे त्याच्या बेस व्हेरिएंट M2 मध्ये तुम्हाला 8 सीटचा पर्याय मिळतो. Mahindra Marazzo ची किंमत 13.41 लाख रुपयांपासून सुरू होते. यात 1.5-लिटर डिझेल इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

Toyota Innova Crysta: टोयोटाची इनोव्हा ग्राहकांच्या मनावर वर्षानुवर्षे राज्य करत आहे परंतु ही कार 7 सीटर तसेच 8 सीटर पर्यायामध्ये येते हे फार कमी लोकांना माहिती आहे. याच्या 8 सीटर व्हेरिएंटची किंमत 18.14 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात 2.7-लिटर पेट्रोल इंजिन (166PS आणि 245Nm) देण्यात आले आहे.

 

Web Title: 8 Seater Car Why buy a 5 or 7 seater car when you can get an 8 seater for 13 lakhs See the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.