6-7 सीटर सोडा! भारतातील 'या' आहेत 8 सीटर कार, पहिल्या कारची किंमत फक्त 13 लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 06:03 PM2022-12-14T18:03:18+5:302022-12-14T18:04:21+5:30
8 seater cars : एमपीव्ही कारच्या यादीत इनोव्हा क्रिस्टा हे सर्वात लोकप्रिय नाव आहे. वर्षानुवर्षे ते ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे.
नवी दिल्ली : भारतीय ऑटो मार्केटमध्ये एसयूव्हीनंतर जर कोणत्या कारला मागणी असेल तर ती म्हणजे एमपीव्हीला आहे. तुमच्या मोठ्या कुटुंबाला लांबच्या सहलीवर घेऊन जाण्यासाठी असो किंवा व्यावसायिक वापरासाठी असो, एमपीव्ही कारमध्ये उपलब्ध असलेल्या जास्त सीट्स तुमचे काम सोपे करते. भारतात उपलब्ध असलेल्या 7 सीटर कारची मोठी लिस्ट आहे. पण, जर तुम्हाला 7 सीट्सही कमी वाटत असतील तर आम्ही तुमच्यासाठी 8 सीटर कारची लिस्ट घेऊन आलो आहोत. विशेष बाब म्हणजे, या लिस्टमधील पहिली कार फक्त 13 लाख रुपयांमध्ये मिळते.
1. Mahindra Marazzo
महिंद्रा कंपनीची ही एमपीव्ही विक्रीच्या बाबतीत आपली जादू दाखवू शकली नाही, परंतु सुविधांच्या बाबतीत ती कुणापेक्षा कमी नाही. या एमपीव्हीची किंमत 13.41 लाख रुपयांपासून सुरू होते. कारचा बेस M2 व्हेरिएंट तुम्हाला फक्त 8 सीट्सचा ऑप्शन ऑफर करते. कारला 1.5-लिटर डिझेल इंजिन (122PS आणि 300Nm) चा ऑप्शन देण्यात आला आहे, जो 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडला गेला आहे.
2. Toyota Innova Crysta
एमपीव्ही कारच्या यादीत इनोव्हा क्रिस्टा हे सर्वात लोकप्रिय नाव आहे. वर्षानुवर्षे ते ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. या कारची किंमत 18.09 लाख रुपयांपासून सुरू होते. कारचे 8 सीटर व्हेरिएंट 18.14 लाख रुपये (एक्स-शोरूम) मध्ये मिळेल. ही कार 2.7-लीटर पेट्रोल इंजिन (166PS आणि 245Nm) सह येते.
3. Lexus LX
या लिस्टमधील Lexus LX ही सर्वात महागडी कार आहे. कारची किंमत 2.63 कोटी रुपये आहे. अतिशय शक्तिशाली इंजिन आणि शक्तिशाली फीचर्ससह येणारी ही SUV 8 लोक बसू शकते. यात 5663 cc इंजिन आहे, जे 362 bhp आणि 530 Nm जनरेट करते. ही SUV 0-100kmph चा वेग 7.7 सेकंदात पकडते.