प्रश्न शंभर रुपयांचा! तुमच्या कारच्या टायरमध्ये नायट्रोजन हवा भरता की साधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 15:17 IST2023-10-25T15:14:18+5:302023-10-25T15:17:02+5:30
पावसाळा तर नीट पाहिलाही नाही तोवर उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. बरेचजण दहा-वीस रुपये देऊन किंवा पेट्रोल पंपांवर फुकट मिळते म्हणून साधी हवाच भरतात.

प्रश्न शंभर रुपयांचा! तुमच्या कारच्या टायरमध्ये नायट्रोजन हवा भरता की साधी?
अनेकांना हे माहिती नसते की त्यांच्या कारच्या टायरमध्ये कोणती हवा भरायची. बरेचजण दहा-वीस रुपये देऊन किंवा पेट्रोल पंपांवर फुकट मिळते म्हणून साधी हवाच भरतात. परंतू, तुम्हाला याची कल्पना आहे का, हीच फुकटची किंवा स्वस्तातली हवा जिवावर बेतू शकते?
पावसाळा तर नीट पाहिलाही नाही तोवर उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. अशातच तापमानही वाढले आहे. त्यात सिमेंट असो की डांबराचे रस्ते ते देखील तापू लागले आहेत. असे असताना साधी हवा भरून आपण आपलेच नुकसान करून घेत आहोत. आज छोट्या शहरांत एका टायरमध्ये नायट्रोजन भरायचा झाल्यास २५-३० रुपयांप्रमाणे चार टायरचे १०० ते १२० रुपये होतात. परंतू, अनेकजण लाखोंची कार घेऊन हजारोंचे पेट्रोल, डिझेल भरत असले तरी थोडक्यासाठी साधी हवा भरतात.
रस्ता आधीच गरम असतो, त्यात टायरचे घर्षण होऊन टायरमधील हवा आणखी तापते. यामुळे साधी हवा असेल तर ती एक्स्पांड पावते. यामुळे टायर फुटण्याचा धोका वाढतो. नायट्रोजन हा मुळात थंड प्रकृतीचा आहे. यामुळे हवा तापते तेवढे त्याचे तापमान वाढत नाही. तसेच साधी हवा हळूहळू कमी होत जाते. नायट्रोजनचे हे प्रमाणही कमी आहे. यामुळे एकदा फुल भरल्यानंतर फक्त टॉपअपचाच खर्च येतो.
नायट्रोजन हवेच्या वापरामुळे टायरमधील ऑक्सिजन कमी होतो आणि ऑक्सिजनमधील पाण्याचे प्रमाणही नाहीसे होते. यामुळे साध्या हवेमुळे जे रिमला नुकसान होते ते होत नाही. नायट्रोजन हवेच्या वापरामुळे टायरचे आयुष्य वाढते आणि मायलेजही सुधारते. सामान्य हवेच्या तुलनेत, नायट्रोजन हवा जास्त काळ टिकते आणि वारंवार भरण्याची आवश्यकता नसते आणि म्हणूनच फॉर्म्युला वन रेसमध्ये धावणाऱ्या प्रत्येक कारच्या टायरमध्ये नायट्रोजन हवा वापरली जाते.