ई-वाहनांच्या खरेदीची ‘लाट’!, २०२२ मध्ये एकूण ३८ लाख प्रवासी वाहनांची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 11:17 AM2023-01-03T11:17:05+5:302023-01-03T11:17:38+5:30
२०२२ मध्ये लाेकांनी खिसा माेकळा करून आवडीचे वाहन खरेदी केले. वाहन विक्रीत माेठी वाढ हाेण्यामागे सेमीकंडक्टरचा सुरळीत पुरवठा आणि मागणीत झालेली वाढ, ही प्रमुख कारणे आहेत.
नवी दिल्ली : देशात सणासुदीच्या हंगामानंतरही वाहन विक्रीचा वेग कमी झालेला नाही. वाहन उद्याेगासाठी २०२२ हे वर्ष जाेरदार राहिले. गेल्या वर्षी घरगुती वाहन विक्री तब्बल २३ टक्क्यांनी वाढली. एकूण ३७.९३ लाख वाहनांची विक्री झाली आहे. त्यात ई-वाहनांची विक्रीची लाट दिसली असून ३०० टक्क्यांनी विक्री वाढली आहे.
२०२२ मध्ये लाेकांनी खिसा माेकळा करून आवडीचे वाहन खरेदी केले. वाहन विक्रीत माेठी वाढ हाेण्यामागे सेमीकंडक्टरचा सुरळीत पुरवठा आणि मागणीत झालेली वाढ, ही प्रमुख कारणे आहेत. २०२१ मध्ये काेराेनाच्या दुसऱ्या लाटेचा माेठा फटका बसला हाेता. सुरुवातीचे काही महिने लाॅकडाऊनमध्येच गेले हाेते. याशिवाय जगभरात सेमीकंडक्टर चिपपुरवठा कमी झाला हाेता. त्यामुळे वाहनांचा पुरवठा कमी झाला. अनेक गाड्यांसाठी ३-४ महिन्यांची वाट बघावी लागत हाेती. २०२२ मध्ये सेमीकंडक्टर चिपचा पुरवठा सुरळीत झाल्यामुळे वाहनांचे उत्पादन वाढले. सणासुदीच्या हंगामात ऑक्टाेबर आणि नाेव्हेंबरमध्ये लाेकांनी आवडत्या गाड्या खरेदी केल्या. डिसेंबरमध्येही मागणी वाढलेली हाेती.
एसयूव्हींची विक्री वाढली
१० लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किमतीच्या प्रवासी वाहनांची विक्री ४० टक्के राहिली. त्यात एसयूव्ही श्रेणीमध्ये येणाऱ्या वाहनांची मागणी वाढली. ही विक्री ४२.३ टक्के एवढी झाली.
२०२२ ठरले विक्रमी
कंपनी २०२२ २०२१ (%)
मारुती सुझुकी १५.७६ लाख १३.६४ लाख १६
ह्युंदाई ५.५२ लाख ५.०५ लाख ९.४
टाटा माेटर्स ५.२६ लाख
टाेयाेटा १.६० लाख १.३० लाख २३
हाेंडा कार्स ९५ हजार ८९ हजार ०७
स्काेडा ऑटाे ५३ हजार २३ हजार ११०