Activa Electric Scooter: होंडाची मोठी घोषणा! इलेक्ट्रीक अ‍ॅक्टिव्हा पेट्रोल Activa पेक्षाही स्वस्त असणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 08:39 PM2022-09-18T20:39:48+5:302022-09-18T20:40:07+5:30

Activa Electric Scooter: देशातील सर्वाधिक स्कूटर बनविणारी दुसरी कंपनी होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने इलेक्ट्रीक स्कूटर भारतीय बाजारात आणण्याची तयारी सुरु केली आहे.

Activa Electric Scooter: Honda's Big Announcement! electric Activa will be cheaper than the petrol Activa | Activa Electric Scooter: होंडाची मोठी घोषणा! इलेक्ट्रीक अ‍ॅक्टिव्हा पेट्रोल Activa पेक्षाही स्वस्त असणार

Activa Electric Scooter: होंडाची मोठी घोषणा! इलेक्ट्रीक अ‍ॅक्टिव्हा पेट्रोल Activa पेक्षाही स्वस्त असणार

googlenewsNext

देशातील इलेक्ट्रीक गाड्यांच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. आता मोटरसायकल आणि स्कूटर या दुचाकी बाजारातील दादा असलेल्या कंपन्यांनी देखील बाजारपेठेत उतरण्यास सुरुवात केली आहे. असे असताना अद्याप ईव्ही बाजारात न आलेल्या होंडा कंपनीने मोठी घोषणा केली आहे. 

देशातील सर्वाधिक स्कूटर बनविणारी दुसरी कंपनी होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने इलेक्ट्रीक स्कूटर भारतीय बाजारात आणण्याची तयारी सुरु केली आहे. या दशकाच्या अखेरपर्यंत भारतातील ३० टक्के बाजारपेठ काबीज करण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे. याचबरोबर ईलेक्ट्रीक स्कूटरची किंमत कीती असेल याचाही खुलासा कंपनीने केला आहे. 

होंडा अ‍ॅक्टिव्हा ईलेक्ट्रीकची किंमत ही पेट्रोल अ‍ॅक्टिव्हापेक्षा कमी असेल असे होंडा कंपनीचे भारतातील अध्यक्ष अत्सुशी ओगाटा यांनी म्हटले आहे. होंडाची इलेक्ट्रीक स्कूटर सध्या डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. कंपनी येत्या काळात आणखी इलेक्ट्रीक स्कूटरची मॉडेल लाँच करणार आहे. या दशकात कंपनी दहा लाख इलेक्ट्रीक स्कूटर विकणार आहे. ऑगस्टमध्ये होंडाच्या अ‍ॅक्टिव्हाला खूप मागणी होती, असे ते म्हणाले. 

आम्ही इलेक्ट्रिक स्कूटरची लेक फिजिबिलिटी पूर्ण केली आहे. कंपनी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरला Activa असे नाव देखील देऊ शकते. कारण हे भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे. HMSI त्याच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्वॅप करण्यायोग्य बॅटरी सारखी वैशिष्ट्ये देखील देऊ शकते. कमी रेंज ते मोठ्या रेंजच्या स्कूटर कंपनी लाँच करणार आहे, असे ओगाटा म्हणाले. 

HMSI च्या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 60 kmph असू शकतो. होंडाची अ‍ॅक्टिव्हा सध्या 72,000 ते 75,000 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यामुळे इलेक्ट्रीक स्कूटर ही ६५ ते ७० हजाराच्या आसपास असू शकते. पुढील पाच वर्षांपर्यंत होंडा अ‍ॅक्टिव्हाची भारतीय बाजारात विक्री केली जाईल, असे कंपनीने नुकतेच जाहीर केले होते. Honda Activa ही सध्या भारतात सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे.

Web Title: Activa Electric Scooter: Honda's Big Announcement! electric Activa will be cheaper than the petrol Activa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.