अॅक्टिव्ह स्टिअरिंग इलेक्ट्रॉनिक्समुळे स्टिअरिंगच्या कार्यात ड्रायव्हरला मिळते सक्रीयता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 08:01 PM2017-10-04T20:01:04+5:302017-10-04T20:01:21+5:30
अॅक्टिव्ह स्टिअरिंगची एक प्रणाली आहे. पुढील चाकांच्या स्टिअरिंग अँगलमध्ये एक इलेक्ट्रिक मोटर बसवलेली असते. या मोटरीला नियंत्रित करणारी एक यंत्रणा असते. या प्रणालीद्वारे स्टिअरिंगच्या अँगलवर नियंत्रण करीत चालकाचा चालनातील क्षमता अधिक वाढवतो.
वाहन उद्योगाला इलेक्ट्रॉनिक्सच्या विविध फायद्यांमधून खूप वेगळी दिशा मिळाली आहे. किंबहुना ती एक प्रक्रिया आहे. त्यामुळे सातत्याने केल्या जात असलेल्या संशोधनांमधून आणखी फायदेही वाहनाला मिळत असल्याने वाहनचालनही सुकर बनण्यास मदत होत आहे. अॅक्टिव्ह स्टिअरिंग ही देखील याच इलेक्ट्रॉनिकच्या वापरातून प्राप्त झालेली सुविधा आहे.
नवीन अॅक्टिव्ह स्टिअरिंगची ही सुविधा स्टिअरिंग कॉलममध्ये बसवलेली एक एकात्मिक प्रणाली आहे. पुढील चाकांच्या स्टिअरिंग अँगलमध्ये एक इलेक्ट्रिक मोटर बसवलेली असते. या मोटरीला नियंत्रित करणारी एक यंत्रणा असते. यामुळे काय होते ते पाहाणे महत्त्वाचे आहे. भले तुमचे स्टिअरिंग पॉवर स्टिअरिंग असले तरीही तुम्हाला अनेकदा काहीवेळा समस्या जाणवते. प्रणालीद्वारे स्टिअरिंगच्या अँगलवर नियंत्रण करीत चालकाचा चालनातील क्षमता अधिक वाढवतो. प्लॅनेटरी गीयर या प्रणालीत लावलेला असतो. कारच्या वेगाबाबत सेन्सर्स वापर केलेला असतो, कारच्या वेगाची माहिती ही या प्रणालीला पोहोचवण्याचे काम होते, त्यातून हा स्टिअरिंगच्या अॅडजेस्टमेंटचे काम करणारी मोटर नियंत्रित केली जाते. गर्दीच्या वा वाहतूक कोंडीच्या स्थितीत इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल व ही पद्धत एकत्रितपणे काम करीत बहुतांशी आधुनिक कारमध्ये हे आढळून येते. वाहतूक कोंडीमध्ये तुमच्या स्टिअरिंग व्हीलमध्ये जी काही कारवाई होत असते, ती नेहमीपेक्षा वेगळी असल्यास लगेच त्या सेन्सर्सला जाणवले जाते व त्याद्वारे आवश्यकतेनुसार स्टिअरिंग व्हीलच्या अँगलवर इलेक्ट्रीक मोटरद्वारे क्रिया होते.त्यामुळे स्टिअरिंग व्हील तुम्हाला जास्त फिरवावे लागत असलेल तर ते किती किमान फिरवता येईल, ते कार्यान्वित होते. कार पार्किंगमध्येही त्या पद्धतीचा वापर होतो व ड्रायव्हरची प्रभावी क्षमता वाढते. सेन्सर्सद्वारे दिलेल्या संदेशातून ही प्रणाली व्हीलच्या अँगलला लहानमोठे करते व त्यामुळे अगदी कुशल ड्रयव्हर जसा ड्रायव्हिंग करू शकतो, त्याप्रमाणे सर्वसाधारण ड्रायव्हिंग करणाराही या प्रणालीमुळे ते काम करू शकतो. एकप्रकारची सहजता त्याला स्टिअरिंगवर जाणवते. हेच या अॅक्टिव्ह स्टिअरिंग प्रणालीचे वैशिष्ट्य आहे.
जेव्हा कारचा वेग जास्त असतो, तेव्हा स्टिअरिंग व्हील फिरवताना ड्रायव्हरला जी सहजता लाभते त्याच प्रकारची सहजता मध्यम गती असताना, कमी गती असताना किंवा वाहतूककोंडीमध्ये ड्राइव्ह करताना त्याला मिळते. खडबडीत रस्ता,ओव्हरस्टिअरिंग, ब्रेकिंग अशावेळी इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल काम करतो.अशावेळी ही प्रणाली कामाला येते. दुसरी एक महत्त्वाची बाब या प्रणालीमध्ये आहे की, जेव्हा समजा इलेक्ट्रॉनिक यंत्रणाही काम करीत नाही, तेव्हा स्टिअरिंग व्हील जड वाटणे, हलकेपणा नष्ट होणे, अधिक घट्ट होणे हे प्रकारही त्यातून होत नाही.इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टिअरिंग हे जेव्हा त्याला नियंत्रित करणारी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा नादुरुस्त होते, तेव्हा ते अतिशय जड लागते, मात्र अॅक्टिव्ह स्टिअरिंग प्रणालीत तसे होत नाही. या यंत्रणेतून प्लॅनेटरी गीयर सेटला लॉक केले जाते आणि नेहमीच्या पद्धतीने स्टिअरिंग वापरू शकता. अर्थात जितका वापर इलेक्ट्रॉनिक्सचा होत आहे, तो जरी लक्षात घेतला तरी या साऱ्या बाबी या मूळ मेकॅनिकल कामाला चालना देणाऱ्या, सुधारणाऱ्या, मदत करणाऱ्या पद्धतीच्या आहेत आधुनिकता जरी असली तरी त्यामुळे मिळणारी सुलभता ही देखभालीने नीट ठेवावी लागते आणि तरीही ती अचानक बंद पडली तर मात्र तुम्हाला तुमच्या कौशल्यावर आश्वस्त राहावे लागते, ही बाब विसरून चालणारी नाही, हेही तितकेच खरे.