20 वर्षांनंतर नदीत सापडली बेपत्ता कार, आता लाखोंमध्ये विक्री, लवकरच रस्त्यावर धावताना दिसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 02:12 PM2023-03-11T14:12:47+5:302023-03-11T14:13:23+5:30
नवीन ऑनरने ते LSX सॉल्वेजकडून विकत घेतले. 9 मार्च रोजी ते 8,500 डॉलर्स म्हणजेच सुमारे 7 लाख रुपयांना विकत घेतले.
नवी दिल्ली : फर्स्ट जनेरेशन Acura NSX ला मार्केटमध्ये चांगली पसंती मिळाली. या कारचे फीचर्स शानदार आहेत. दरम्यान, या कारचा एक फोटो नुकताच फेसबुकवर समोर आला आहे, ज्यामध्ये NSX लोगो दिसत आहे. या कारबद्दल अधिक माहिती याच्या नवीन ऑनरवरून मिळाली आहे. ऑनरने अलीकडे वापरलेले Acura NSX विकत घेतले आणि ते रिस्टोर करत आहे. कारचा नवीन मालक मेरीलँडमधील हेलिक्स ऑटो वर्क्समध्ये आहे. नवीन ऑनरने ते LSX सॉल्वेजकडून विकत घेतले. 9 मार्च रोजी ते 8,500 डॉलर्स म्हणजेच सुमारे 7 लाख रुपयांना विकत घेतले.
दरम्यान, 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात उत्तर कॅरोलिनातील यडकिन नदीत ही कार बेपत्ता झाली होती. 2019 मध्ये हरवलेल्या व्यक्तीच्या तपास प्रकरणात ही कार सापडली होती. LSX सॉल्वेजने फेसबुकवर कारचे फोटो शेअर केली आणि फेसबुकवर बेक्का निकोल जॉन्सनने देखील कारबद्दल फोटो आणि अतिरिक्त माहितीसह कारमध्ये स्वारस्य दाखवले. कारच्या सद्यस्थितीबद्दल सांगायचे तर, या कारची ग्लास गायब आहे. ही कार रिस्टोअर करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. कारचे फोटो स्पष्टपणे दर्शवतात की, NSX चे हे मॉडेल वाळू आणि कचऱ्याने भरलेली आहे. पॅसेंजर साइडचा ए-पीलर वाकलेला आहे. समोरच्या फॅसिआमध्येही गडबड आहे आणि बाहेरील बाजूसही काही पेंट शिल्लक आहे.
डेडिकेटेड ट्रॅक कार म्हणून रिस्टोर केली जाऊ शकते
बेक्कासोबत झालेल्या चर्चेत Motor1.com ला कारच्या पुनर्विक्री मूल्याबद्दल माहिती देते. स्ट्रीट रेसिंगसाठी कार तयार करणे नक्कीच सोपे असणार नाही. जर ती रस्त्यावर परत आणता आली नाही, तर ती किमान डेडिकेटेड ट्रॅक कार म्हणून रिस्टोर केली जाऊ शकते. 20 वर्षे पाण्याखाली असलेली कार पुन्हा तयार करणे सोपे नाही, परंतु हेलिक्स ऑटो वर्क्सने ही कार रिस्टोर करण्याचा प्रयत्न करत आहे. नवीन कार ऑनरने, याच्या हेलिक्स ऑटो वर्क्सचे आभार मानले आहेत.