अॅडाप्टिव्ह हेडलाइट्स... वळणांवर रात्री रस्ता अधिक सुस्पष्ट करणारा आधुनिक तंत्रज्ञानाचा अविष्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 11:50 AM2017-10-02T11:50:28+5:302017-10-02T11:53:25+5:30

इलेक्ट्रॉनिक्सने केलेली अॅडॉप्टिव्ह हेडलाइटची कमाल भारतात अद्याप तरी सर्व कार्सना दिलेली नाही. उच्च श्रेणीतील कार्सना ही सुविधा दिलेली आढळते. युरोप वा अमेरिकेत दिसणारी ही सुविधा भारतात येण्यास वेळ लागणार नाही, फक्त किंमत जास्त मोजावी लागेल इतकेच

Adaptive headlights ... Innovative modern technology more transparent night driving | अॅडाप्टिव्ह हेडलाइट्स... वळणांवर रात्री रस्ता अधिक सुस्पष्ट करणारा आधुनिक तंत्रज्ञानाचा अविष्कार

अॅडाप्टिव्ह हेडलाइट्स... वळणांवर रात्री रस्ता अधिक सुस्पष्ट करणारा आधुनिक तंत्रज्ञानाचा अविष्कार

Next
ठळक मुद्देवळणाची दिशा दर्शवणारा हा अॅडाप्टिव्ह हेडलाइट्स प्रामुख्याने उच्च कार्सना बसवला जातोभारतामध्ये फार कमी प्रकारच्या वाहनामध्ये तो आढळतोअॅडाप्टिव्ह हेडलाइट्स हे तुमच्या स्टिअरिंगला, वेगाला, कारच्या उंचीला, चढ व उताराला प्रतिसाद देत त्यानुसार आपोआप जुळवून घेतात

रात्रीच्यावेळी कार चालवताना शहरांमधून बाहेर पडल्यावर स्ट्रीट लाइट्सचा झगमगाट संपतो. त्यावेळी तुम्हाला तुमच्या कारचे हेडलाइट्स हेच रस्ता सुस्पष्ट करणारे असतात. त्याला असलेले अप्पर व डिप्पर हे त्यामधील साधेसुधे तंत्र आहे. पण त्या पलीकडेही लाइट्स तुम्हाला काहीवेळा अत्यावश्यक वाटतात. लांबचे पाहाण्यासाठी काहीवेळा अप्पर लाइट लावूनही तुम्हा रस्ता पूर्ण नजरेत बसत नाही. त्यावेळी तुमच्या रस्त्याला वळण आलेले असले तर रस्त्यावर पडणारा तुमच्या हेडलाइटचा प्रकाशझोत हा वळणानुसार वळत नाही. त्यामुळे वळणावर तुम्हाला वेगही साहजिक धीमा करावा लागतो.
मात्र या अॅडाप्टिव्ह हेडलाइट्सना काही चांगली वैशिष्ट्ये देऊन तयार केले गेलेले आहे. त्यामुळे रात्री किंवा कमी वा अंधुक प्रकााशामध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग करणे बरेचसे सोयीचे जाते. वळाणांच्या रस्त्यांमध्ये तुम्हाला दृश्यमानता अधिक मिळते, चढावाववरील रस्त्यांवर वा उतारावरील रस्त्यांवर तुम्हाला या प्रकारच्या लाइट्समुळे अधिक विश्वासार्हपणे ड्राइव्ह करता येते. रस्त्याच्या वळणाच्या कडांवर लाइट तुम्हाला रस्त्याचा भाग प्रकाशमान करीत जातो, त्यावेळी हा प्रकाशझोत काहीसा खाली व रस्त्याला प्रकाशमान करतो. तसेच समोरून येणार्या वाहनाच्या ड्रायव्हरलाही विचलीत करीत नाही. तर तुम्हाला वळणदार रस्त्यावरील भागही अधिक प्रकाशमान करून रस्त्याची दृश्यमानता वाढवतो.

वळणाची दिशा दर्शवणारा हा अॅडाप्टिव्ह हेडलाइट्स प्रामुख्याने उच्च कार्सना बसवला जातो. भारतामध्ये फार कमी प्रकारच्या वाहनामध्ये तो आढळतो. त्याच्याशी संबंधित सेन्सर्स हे रस्त्याच्या वळणाबरोबरच तुमच्या कारचा वेग किती आहे ते देखील पडताळून तुम्च्या स्टिअरिंगचा कोन कशा प्रकारे वळत आहे हे देखील तपासून वळणदार रस्त्याप्रमाणे तुम्हाला तो प्रकाशदेत मार्गदर्शन करीत असतो.

सर्वसाधारण हेडलाइट्स हे सरळ पडत असतात. मात्र अॅडाप्टिव्ह हेडलाइट्स हे तुमच्या स्टिअरिंगला, वेगाला, कारच्या उंचीला, चढ व उताराला प्रतिसाद देत त्यानुसार आपोआप जुळवून घेत तुमचा रस्ता व रस्त्याची वळणेही प्रकाशमान करीत असतात.जेव्हा तुमची कार उजव्या बाजूला वळते तेव्हा त्या स्टिअरिंगच्या वळवण्याने होणाऱ्या जाणीवेतूनच तुम्हाला तुमच्या हेडलाइट्सचा कोन, अंश त्यानुसार वळलेला आठळतो. डाव्या बाजूला वळतानाही त्यानुसार तुमच्या हेडलाइटचा अँगल त्या दिशेला वळलेला आढळतो. यामुळे ड्रायव्हरला कार चालवणे वा वाहन चालवणे रात्रीच्यावेळीही चांगल्या प्रकाशामध्ये चालवता येणे शक्य होते. साधारण पूर्ण रस्त्यावर हा प्रकाश पडतो. तो समोरच्या वाहनाच्या चालकाच्या डोळ्यावर पडत नाही, त्यामुळे त्या वाहनालाही त्रास होत नाही, तुमच्याही वाहनाला पुढे नेताना समोरच्या वाहनाच्या प्रकाशामुळे दीपायला होत नाही.

हे सारे इलेक्ट्रॉनिक्स सेन्सर्समुळे शक्य झाले आहे. तुमची कार गतीमध्ये असताना रस्त्यामुळे व तुमच्या स्टिअरिंगच्या कार्यचालनामुळे विशिष्ट बाजूला शुकत असते.रस्त्याप्रमाणे हे झुकणे बदलत असते.त्यानुसार सेन्सर्सही काम करीत असतात. त्या सेन्सर्सच्या आधारेहेडलाइट्समध्ये संलग्न असणारी एक छोटी मोटर तुमच्या हेडलाइटला वळवत असते, जसे सेन्सर्स सांगेल तसे हे हेडलाइट्सचे वळणे असते, जे तुमची कार ज्या प्रकारच्या वळणावरून जात असेल तशी तशी तिचे वळणे व झुकणे सेन्सर्स टिपत असतात व त्यानुसार ते हेडलाइट संलग्न मोटरीला संदेश देऊन हेडलाइट १५ ते ३० अंशापर्यंत वळू शकतात.

अर्थात प्रत्येक कंपनीच्या कारमधील यंत्रणेनुसार त्यात कमी अधिक फरक असतो. काही मोटारींना या प्रकारचे हेडलाइटही रस्त्याच्या जास्त वळणामध्ये उपयुक्त ठरणार नाहीत, असे वाटले तर कॉर्नरचे लाइटही असतात व ते आपोआप लागले जातात त्यामुळे रस्त्याच्या कडा तुम्हाला अधिक स्पष्ट दिसू शकतात. अर्थात इलेक्ट्रॉनिक्सच्या या सेन्सर्सची ही कमाल आहे, मात्र भारतात अजून सर्व कार्सना ही सुविधा देण्यात आलेली नाही.

Web Title: Adaptive headlights ... Innovative modern technology more transparent night driving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.