बाईक नाही, ही आहे दोन चाकांची कार; चालवायलाही झक्कास! देण्यात आल्या आहेत खास सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 12:41 AM2022-03-23T00:41:20+5:302022-03-23T00:44:29+5:30
या बाईकला कंपनीकडून एक छतही देण्यात आले आहे. ते फोल्ड होऊन मागच्या डिक्कीतही बंद होते.
आपल्याला आपल्या मोटारसायकलमध्ये काय-काय सुविधा असाव्यात असे वाटते? आपण कधी विचार केला की, आपल्या मोटारसायकमध्ये एसी व्हेंट्स, म्युझिक सिस्टीम आणि छतही असायला हवे. नसेल केला. पण हो 2011 पासून अशी एक बाईक जगात अस्तित्वात आहे आणि तिचे नाव आहे Adiva AD 200. या बाईकमध्ये आणखी काय-काय विशेष आहे, जाणून घ्या...
दमदार इंजिन-
Adiva AD 200 एक इंटरनॅशनल बाईक आहे. हिला 171cc चे सिंगल सिलेंडर 4-स्ट्रोक इंजिन आहे. ये 15.8hp की पॉवर आणि 15.3 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे लिक्विड कूल्ड इंजिन असून या कार सारख्या बाईकचे वजन 172 किलोग्रॅम एवढे आहे. या बाईकच्या टाकीत एकावेळी 12 लीटर पेट्रोल बसते.
छतापासून एसीपर्यंत -
या बाईकला कंपनीकडून एक छतही देण्यात आले आहे. ते फोल्ड होऊन मागच्या डिक्कीतही बंद होते. तसेच आपण या बाईकचे छत फोल्ड केले नाही, तर डिक्कीमध्ये 2 हेल्मेट बसतील एवढी जागा आहे. या बाईकच्या हँडल बारच्या खाली कार प्रमाणेच डॅशबोर्ड असतो. यात म्यूझिक सिस्टिमसाठी स्पेस, दोन्ही बाजूंना एसी व्हेंट्स आणि स्पिकरही आहे. या बाईकला मागचे सीटही आहे.
याशिवाय या बाईकमध्ये सिगारेट लायटर, व्हिंड स्क्रीन आणि ती स्वच्छ करण्यासाठी वायपरही आहे. एवढेच नाही, तर ही बाईक तीन चाकीतही उपलब्ध आहे. आपल्याला भारतात ही बाईक हवी आसेल तर इंपोर्ट करावी लागेल. ही बाईक युरोप, सिंगापूर आणि जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर पसंत केली जाते.