'फूल पैसा वसूल बाईक्स', कमी किमतीत दमदार मायलेज!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 10:54 AM2022-02-21T10:54:53+5:302022-02-21T10:55:17+5:30
Affordable Bikes : आम्ही तुम्हाला 50,000 ते 60,000 रुपयांच्या दरम्यान असलेल्या बाईक्सची माहिती देत आहोत, ज्यांचे मायलेजही मजबूत आहे.
नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडत आहेत. यातच स्वस्त आणि परवडणाऱ्या बाईक्स हा अतिशय प्रभावी पर्याय म्हणून समोर आला आहे. त्यांची किंमत कमी आहे आणि त्यांनी मायलेजच्या बाबतीतही सर्वांना मात दिली आहे. इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी तर दूरची गोष्ट वाटत असली तरी या बाईक्ससाठी सध्या कमीत कमी प्रमाणात पेट्रोल लागते. मध्यमवर्गीय कुटुंबांचा सर्वाधिक पसंतीचा हा सेगमेंट आहे, जो एका दशकाहून अधिक काळ त्यांचे प्राधान्य आहे. दरम्यान, आम्ही तुम्हाला 50,000 ते 60,000 रुपयांच्या दरम्यान असलेल्या बाईक्सची माहिती देत आहोत, ज्यांचे मायलेजही मजबूत आहे.
Bajaj CT 100
Bajaj CT 100 ही कंपनीची सर्वात स्वस्त बाईक आहे, जी इलेक्ट्रिक स्टार्टसह विकली जात आहे. त्याची मुंबईतील एक्स-शोरूम किंमत 52,510 रुपये आहे. जी टॉप मॉडेलसाठी 60941 रुपयांपर्यंत जाते. ही बाईक 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या बेस्ट बजेट बाइक्समध्ये समाविष्ट करण्यात आली असून तिला 102 सीसी इंजिन देण्यात आले आहे. एक लिटर पेट्रोलमध्ये ही बाईक 90 किमी चालवता येते.
TVS Sport
TVS Sport ही काही चांगले फीचर्स असलेली एक स्टायलिश बाईक आहे. यासोबत 99.7 सीसी इंजिन देण्यात आले आहे, जे 7.8 पीएस पॉवर आणि 7.5 एनएम पीक टॉर्क बनवते. हे इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकचा पुढचा भाग टेलिस्कोपिक फोर्क्ससह येतो आणि मागील भाग ट्विन शॉक शोषकांसह येतो. ही बाईक 1 लिटर पेट्रोलमध्ये 75 किमी चालवता येते. त्याची मुंबईत एक्स-शोरूम किंमत 57,967 रुपयांपासून सुरू होते आणि 63,176 रुपयांपर्यंत जाते.
Hero HF Deluxe
Hero HF Deluxe ही बाईक भारतीय बाजारपेठेतही खूप पसंत केली जात असून ती 5 व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. बाईकसोबत 97.2 सीसी इंजिन देण्यात आले आहे, जे 8.36 पीएस पॉवर आणि 8.05 एनएम पीक टॉर्क बनवते. ही बाईक 1 लिटर पेट्रोलमध्ये 82.9 किमी चालवता येते. बाईकची एक्स-शोरूम किंमत मुंबईत 52,040 रुपयांपासून सुरू होते आणि 62,903 रुपयांपर्यंत जाते. यामध्ये इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टीम, 5-स्पोक अलॉय व्हील्स आणि हेडलाईट ऑन सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
Bajaj Platina 100
Bajaj Platina 100 ही देखील सर्वात स्वस्त बाईक्सपैकी एक आहे, जी पहिल्यांदा 2005 मध्ये लाँच करण्यात आली होती. कंपनीने आतापर्यंत या बाईकच्या 5 लाख युनिट्सची विक्री केली आहे. ही बाईक किक-स्टार्ट आणि इलेक्ट्रिक-स्टार्ट व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे आणि तिची एक्स-शोरूम किंमत 52,861 रुपये आहे जी टॉप मॉडेलसाठी 63,541 रुपये आहे. बाईकसोबत 102 सीसी इंजिन देण्यात आले असून 1 लिटर पेट्रोलमध्ये बाईक 90 किमी चालवता येते.