Royal Enfield: रॉयल एनफील्डमध्ये सारे काही आलबेल? मोठमोठ्या अधिकाऱ्यांचे राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 04:44 PM2021-09-20T16:44:09+5:302021-09-20T16:46:27+5:30

Royal Enfield in Trouble: कंपनीच्या प्रवक्त्याने यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. कंपनी अशाप्रकारच्या अंदाजावर कोणताही कमेंट करत नाही. ही कंपनीची पॉलिसी आहे, असे म्हटले आहे. मात्र, एका मागोमाग एक असे राजीनामे येऊ लागल्याने एमडी सिद्धार्थ लाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

After CEO's resignation, Royal Enfield's top officers also in Que | Royal Enfield: रॉयल एनफील्डमध्ये सारे काही आलबेल? मोठमोठ्या अधिकाऱ्यांचे राजीनामे

Royal Enfield: रॉयल एनफील्डमध्ये सारे काही आलबेल? मोठमोठ्या अधिकाऱ्यांचे राजीनामे

Next

कोरोनाकाळात विक्री घटल्याने, चिपच्या तुटवड्यामुळे तसेच नव्या गाड्यांच्या लाँचिंगला होत असलेल्या विलंबामुळे बुलेट मोटरसायकल (Bullet motorcycle) बनविणाऱ्या रॉयल एनफील्ड (Royal Enfield) कंपनीत सारे काही आलबेल नसल्याचे दिसत आहे. सीईओ विनोद दसारी यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीचे टॉपचे अधिकारी कंपनीला बायबाय करण्याची शक्यता आहे. (Royal Enfield's Officers may gave resignation in companies tough time.)

रॉय़ल एनफील्ड ही आयशर मोटर्सची (Eicher Motors) कंपनी आहे. आयशर मोटर्सचे एमडी सिद्धार्थ लाल यांच्या अत्यंत जवळचे रॉयल एनफील्डचे चीफ कमर्शिअल ऑफिसर ललित मलिक यांनी देखील राजीनामा दिल्याचे कळत आहे. 

Old Car Selling Tips: सेकंड हँड कार जास्त किंमतीला विकायची असेल तर; या टीप्स नक्की फॉलो करा...

इंटरसेप्टर (Interceptor), थंडरबर्ड एक्स (Thunderbird X), मीटिऑर (Meteor) आणि ऑल न्यू क्लासिक (Classic) मोटरसायकल्स सारख्या मॉडल्सचे यशस्वी लाँचमध्ये मोठी भूमिका असलेल्या ग्लोबल मार्केटिंग हेड शुभ्रांशु सिंह देखील नोटीस पिरिएडवर आहेत. सुत्रांनुसार ते दुसऱ्या कंपनीत मोठ्या पदावर जात आहेत. कंपनी या दोन्ही अधिकाऱ्यांना थांबविण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करत आहे. 

Genesis GV60: चावी कशाला हवी? ह्युंदाईची भन्नाट कार! मालकाचा चेहरा पाहताच दरवाजा उघडणार

कंपनीच्या प्रवक्त्याने यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. कंपनी अशाप्रकारच्या अंदाजावर कोणताही कमेंट करत नाही. ही कंपनीची पॉलिसी आहे, असे म्हटले आहे. मात्र, एका मागोमाग एक असे राजीनामे येऊ लागल्याने एमडी सिद्धार्थ लाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कमी होत चाललेली विक्री वाढविण्यासाठी कंपनी प्रिमिअम बाईक्स लाँच करण्याची तयारी करत असताना सेल्स, मार्केटिंग विभागाचे लोक सोडून जाऊ लागले आहेत. याबाबतचे वृत्त एनबीटीने दिले आहे.

Read in English

Web Title: After CEO's resignation, Royal Enfield's top officers also in Que

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.