Auto News : ...तर उद्यापासून वाहन चालकांच्या अडचणी वाढणार; १३ महत्त्वाची कामं अडकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2020 09:48 AM2020-10-18T09:48:18+5:302020-10-20T10:49:14+5:30
High Security Number Plate RTO: नंबर प्लेटबद्दल आरटीओची महत्त्वाची घोषणा
नवी दिल्ली: कोणत्याही वाहनाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) नसल्यास त्याला फिटनेस सर्टिफिकेट देण्यास आतापर्यंत बंदी होती. पण १५ ऑक्टोबरला परिवहन आयुक्तांनी आदेश जारी करत विना एचएसआरपी वाहनांना आरटीओ (RTO) मध्ये होणाऱ्या काही कामांसाठी मनाई असेल, असे आदेश दिले.
एचएसआरपी एक होलोग्राम स्टिकर असतो. त्यावर वाहनाचं इंजिन आणि चेसीस नंबर असतो. सुरक्षा आणि सुविधा विचारात घेऊन एचएसआरपी तयार करण्यात आली. हा नंबर मशीननं लिहिला जातो. प्लेटवर एक प्रकारची पिन असते, ती वाहनाला जोडलेली असते.
१९ ऑक्टोबरपासून कोणत्या कामांवर बंदी?
- विना एचएसआरपी वाहनाच्या सर्टिफिकेटची सेकंड कॉपी
- वाहनाचं रजिस्ट्रेशन ट्रान्सफर
- पत्त्यात बदल
- रजिस्ट्रेशनचं नुतनीकरण
- ना हरकत प्रमाणपत्र
- आरटीओ हायपॉथिकेशन कॅन्सलेशन
- हायपऑथिकेशन एन्डॉर्समेंट
- नवीन परवाना
- तात्पुरता परवाना
- विशेष परवाना
- राष्ट्रीय परवाना
असा करता येईल ऑनलाईन अर्ज
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आणि कलर कोड स्टिकर लावण्याची प्रक्रिया आता सहजसोपी झाली आहे. एचएसआरपी लावण्यासाठी दोन संकेतस्थळं तयार करण्यात आली आहेत. यासाठी bookmyhsrp.com/index.aspx संकेतस्थळावर जावं लागेल. त्यानंतर सार्वजनिक किंवा खासगी वाहनाशी जोडलेला एक पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर काही माहिती द्यावी लागेल. गाडीला रजिस्ट्रेशन प्लेट असेल आणि केवळ स्टिकर लावायचा असल्यास www.bookmyhsrp.com या संकेतस्थळावर जाऊन माहिती भरावी लागेल.