OLA इलेक्ट्रिक स्कूटरनंतर आता ई-कारची पहिली झलक; जाणून घ्या जबरदस्त फिचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 05:12 PM2023-06-16T17:12:23+5:302023-06-16T17:13:25+5:30
ओलाची ही इलेक्ट्रिक कार तुम्हाला टेस्ला मॉडेल एस आणि मॉडेल 3 ची आठवण करून देते.
नवी दिल्ली - OLA इलेक्ट्रिक आपली पहिली इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात आणणार आहे. इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये वर्चस्व निर्माण केल्यानंतर कंपनीने इलेक्ट्रिक कारही लॉन्च करण्याची घोषणा केली होती. आता यंदा पहिल्यांदाच OLA इलेक्ट्रिक कारचा पहिला फोटो समोर आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कारची पेटंट इमेज ओलाने इंटरनेटवर लीक केली आहे, ज्यामध्ये कारच्या लुक आणि डिझाइनशी संबंधित सर्व माहिती समोर येत आहे.
ओला इलेक्ट्रिक कारचा जो फोटो समोर आला आहे तो पाहून ती अजूनही प्राथमिक टप्प्यावर असल्याचे दिसते. हे पूर्णपणे उत्पादन तयार मॉडेल नाही. कंपनीने या कारची घोषणा करताना एक टीझर जारी केला होता, ज्यामध्ये लाल रंगाच्या कार OLA चे बॅजिंग आणि कारची शार्प लाईन्स दाखवली होती. बातमीच्या सुरुवातीला जो फोटो आहे पण ही पेटंट इमेज त्याच्यापेक्षा खूपच वेगळी दिसते.
नवीन इमेजच्या आधारे बोलायचे झाल्यास, ओलाची ही इलेक्ट्रिक कार तुम्हाला टेस्ला मॉडेल एस आणि मॉडेल 3 ची आठवण करून देते. ही पारंपारिक सेडान सिल्हूट आहे ज्याच्या मागील बाजूस कूप सारखा रुफ मिळतो. बॉडी पॅनेल्सला स्मूथ बनवण्यासोबतच एयरोडायनमिक सुधारित केले आहेत. कारचे मागील चाक बरेच मागे ठेवले गेले आहे, ज्यामुळे कारचा व्हीलबेस नक्कीच वाढेल. कंपनी मोठा बॅटरी पॅक वापरण्याच्या स्वरूपात याचा फायदा घेऊ शकते.
पारंपारिक इलेक्ट्रिक कारप्रमाणे, यात फ्रंट ग्रिल नाही. हेडलॅम्प असेंब्ली बंपरच्या अगदी वर आहे आणि त्यात स्लिम, होरिजेंटल लँम्प आहेत जे एलईडी टेललाइटसह देऊ शकतात. एलईडी लाईट दोन्ही हेडलाइट्सना स्पर्श करणारे संपूर्ण बोनट कव्हर करतात. कंपनीने मागच्या वेळी टीझरमध्ये ग्लॉस रूफ दाखवले असले तरी या कारमध्ये ड्युअल-टोर रूफ दिले जात आहे. कारच्या मागील भागाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
ड्रायव्हिंग रेंजबाबत काय आहे रिपोर्ट?
ओलाच्या आगामी इलेक्ट्रिक कारशी संबंधित तांत्रिक माहिती अजूनही खूप मर्यादित आहे. पण याला 70-80kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला जाण्याची शक्यता आहे ज्याची रेंज 500 किमी पेक्षा जास्त आहे. ओलाने यापूर्वी असेही म्हटले आहे की, आगामी इलेक्ट्रिक कारला केवळ 4 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास गती देण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. ही देशातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार असेल. ताज्या माहितीनुसार, पुढील वर्षभरात ही इलेक्ट्रिक कार बाजारात आणण्याची योजना आहे.