Video पाहून चकित व्हाल! Alibabaची एका चाकावर चालणारी ईलेक्ट्रीक बाईक लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 03:33 PM2021-03-30T15:33:45+5:302021-03-30T15:36:27+5:30
Alibaba Electric Bike : इलेक्ट्रीक वाहनांचा बाजार जगभरात वेगाने पसरू लागला आहे. यामध्ये विविध फिचर देण्यात येत आहेत. दिल्लीच्या आयआयटीच्या एका स्टार्टअपने लुनासारख्या दिसणाऱ्या स्कूटरला रिव्हर्स पार्किंग सिस्टिम दिली आहे. या पुढची कडी म्हणजे आता एका चाकावर चालणारी बाईक लाँच करण्यात आली आहे.
स्कूटर, बाईक म्हटली की दोन चाके आलीच. परंतू तुम्ही कधी एक चाकाची बाईक पाहिली आहे का? ती पण इलेक्ट्रीक. चीमची मोठी ईकॉमर्स कंपनी अलीबाबा (Alibaba) ने विचित्र वाटणारी एका चाकाची इलेक्ट्रीक बाईक (Electric bike.) लाँच केली आहे. या आधी तुम्ही असे एक चाकाचे वाहन सर्कसमध्ये पाहिले असेल. परंतू आता ही बाईक रस्त्यावर धावताना दिसणार आहे. (China's Alibaba launches Electric bike.)
इलेक्ट्रीक वाहनांचा बाजार जगभरात वेगाने पसरू लागला आहे. यामध्ये विविध फिचर देण्यात येत आहेत. दिल्लीच्या आयआयटीच्या एका स्टार्टअपने लुनासारख्या दिसणाऱ्या स्कूटरला रिव्हर्स पार्किंग सिस्टिम दिली आहे. या पुढची कडी म्हणजे आता एका चाकावर चालणारी बाईक लाँच करण्यात आली आहे. या बाईकची आणखी एक खासियत म्हणजे ही बाईक वाय़रलेस चार्ज करता येणार आहे. म्हणजेच ही बाईक विनातारेची चार्ज करता येणार आहे.
या बाईकला सामान्या बाईकप्रमाणे बॉडी फ्रेम आहे. तसेच बाईकवरील टँकसारखा आकार ड्युकाटी मॉन्स्टरसारखी दिसते. लाल रंगातील बॉडीफ्रेम मस्क्युलर लूक देते. जरी ही बाईक एका चाकावर चालणारी असली तरी देखील या बाईकला माठीमागे बसण्यासाठी दुसरी सीटदेखील देण्यात आली आहे. या सीटचा उपयोग काय असेल हे मात्र समजण्यापलिकडे आहे.
या बाईकमध्ये 2,000 watt ची ताकद निर्माण करणारे इंजिन देण्यात आले आहे. या बाईकचा टॉपचा स्पीड हा 48 किमी प्रतितास आहे. फास्ट लेनमध्ये ही बाईक किती स्थिरतेने चालेल हे आताच सांगता येणार नाही. बाईकचे वजन 40 किलो आहे. या बाईकमध्ये पॅनासोनिकचे बॅटरी पॅक देण्यात आले आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केली की 60 ते 100 किमीची रेंज देते. ही बॅटरी चार्ज करण्य़ासाठी 3 ते 12 तास लागतात.
ही बाईक कशी चालते हे तुम्हीच पहा...