नव्या कोऱ्या रुपात Maruti Suzuki Alto येतेय; जाणून घ्या कधी लाँच होणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 09:26 AM2021-03-22T09:26:12+5:302021-03-22T09:26:37+5:30

Maruti Suzuki Alto: देशातील सर्वाधिक खपाची कार म्हणून बिरुदावली मिरवत असलेली मारुती सुझुकी अल्टो (Maruti Suzuki Alto) लवकरच नव्या रुपात मारुतीप्रेमींसाठी येणार आहे.

All new generation Maruti Suzuki Alto will launch in India at year end | नव्या कोऱ्या रुपात Maruti Suzuki Alto येतेय; जाणून घ्या कधी लाँच होणार...

नव्या कोऱ्या रुपात Maruti Suzuki Alto येतेय; जाणून घ्या कधी लाँच होणार...

Next

सध्याच्या ट्रेंडनुसार इतर कंपन्या कॉम्पॅक्ट एसयुव्हींपासून मोठ्या एसयुव्हींपर्यंत गाड्या बाजारात आणत असताना देशातील सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकी हॅचबॅक आणि छोट्या कारवर लक्ष केंद्रीत करत आहे. देशातील सर्वाधिक खपाची कार म्हणून बिरुदावली मिरवत असलेली मारुती सुझुकी अल्टो (Maruti Suzuki Alto) लवकरच नव्या रुपात मारुतीप्रेमींसाठी येणार आहे. छोटा आकार, जास्त मायलेज आणि कमी किंमत यामुळे या कारचे प्रत्येक जनरेशनची खुप विक्री झाली आहे. यामुळे कंपनीने या कारचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच करण्याची तयारी केली आहे. कंपनी या वर्षीच्या अखेरपर्यंत अल्टो भारतीय बाजारात लाँच करणार आहे. (Maruti Suzuki Alto facelift will launch soon.)


नव्या अल्टोमध्ये काय बदल?
नवीन अल्टोमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत. जपानच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार नवीन मॉडेल HEARTECT प्लॅटफॉर्मवर आधारीत असणार आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर मारुतीच्या वॅगन आर आणि एस प्रेसोमध्ये केला जातो. कारमध्ये 660cc नॅचरली अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात येणार आहे. हे इंजिन 49bhp ताकद तयार करणार आहे. 


अल्टोसोबतच ग्राहकांना नव्या सेलेरिओची देखील प्रतिक्षा आहे. सेलेरिओचे जे फोटो बाहेर पडत आहे त्यावरून सध्याच्या सेलेरिओपेक्षा ही नवी सेलेरिओ थोडी मोठी असणार आहे. यामुळे आधीपेक्षा जास्त स्पेसिअस केबिन मिळणार आहे. तसेच नवीन डिझाईन कारला नवीन फ्रेश लुक देणार आहे. नव्या सेलेरिओमध्ये 1.0 लीटर थ्री सिलिंडर K10B नॅचरली अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात येईल. हे इंजिन सध्याच्या सेलेरिओमध्ये वापरले जाते. हे इंजिन 68PS ताकद आणि 90Nm पीक टॉर्क निर्माण करणार आहे. 


नवे रंग, नवे इंजिन! नवी Maruti Suzuki Swift लाँच; मोठमोठ्या SUV चे फिचर्स

Maruti Suzuki Swift च्या फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च करण्यात आले असून, मारुती सुझुकी स्विफ्टचा मिडलाइफ मेकओव्हर करण्यात आला आहे. या नव्या लुकसह स्विफ्ट लवकरच मारुतीच्या विविध शोरुम्समध्ये पाहायला मिळेल. नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट नवीन फ्रंट फॅसिआसह सादर करण्यात आली आहे. मारुती सुझुकीने नवीन स्विफ्ट फेसलिफ्टसह क्रूझ कंट्रोल दिले आहेत. यासह नव्या स्वीफ्टमध्ये स्टार्ट-स्टॉप तंत्रज्ञानासह नवीन मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले देण्यात आला आहे. Maruti Suzuki Swift चे थर्ड जनरेशन मॉडेल सन २०१७ पासून भारतात उपलब्ध करण्यात आले आहेत. कारच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाले, तर नवीन फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही. Maruti Suzuki Swift च्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये इंटिरियरमध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही. आयडॉल स्टार्ट स्टॉप तंत्रज्ञानासह नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट नेक्स्ट जनरेशन के-सीरिज १.२ लीटर ड्युअल जेट डुअल VVT इंजिन देण्यात आले आहे.
 

Web Title: All new generation Maruti Suzuki Alto will launch in India at year end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.