नव्या Honda Civic Type R चा लूक समोर, मोठी टच स्क्रीन अन् प्रीमियम फिचर्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 05:51 PM2022-07-22T17:51:42+5:302022-07-22T17:54:07+5:30
होंडा कंपनीनं आपली सहाव्या जनरेशनच्या सिविक टाइप आर (Honda Civic Type R) कार अखेर बाजारात आणली आहे.
होंडा कंपनीनं आपली सहाव्या जनरेशनच्या सिविक टाइप आर (Honda Civic Type R) कार अखेर बाजारात आणली आहे. सर्वात आधी या कारबाबतची अधिकृत माहिती २०२१ मध्ये समोर आली होती. यात नवी सिविक कार पाचव्या जनरेशनच्या सिविक कारची जागा घेईल असं सांगण्यात आलं होतं. २०१७ साली सिविक कारच्या पाचव्या जनरेशनची कार बाजारात दाखल झाली होती. यात २०२० मध्ये अपडेट देखील देण्यात आले होते.
होंडा सिविक टाइप आर कार याआधीच्या कारच्या तुलनेत अधिक बोल्ड असणार आहे. न्यू टाइप कारमध्ये नवीन बोनट देण्यात आलं आहे. ज्याचं ग्रिल देखील अपग्रेड करण्यात आलं आहे. त्यामुळे फ्रंट लूक अधिक आकर्षक दिसत आहे. तर इंजिनच्या एअर फ्लोसाठी खास एअर विंड देण्यात आलं आहे. जे याआधीच्या मॉडलपेक्षा खूप वेगळं आहे.
New Civic Type R चे टायर्स आणि ब्रेकिंग सिस्टम
कारमध्ये 19 इंचाचा अलॉय व्हील्सचा वापर करण्यात आला आहे. यात देण्यात आलेले ब्रेकिंग सिस्टम देखील अपग्रेड करण्यात आली आहे. नव्या व्हेरिअंटच्या तुलनेत मोठी विंडस्क्रीन देण्यात आली आहे. यात फिक्स रिअर विंग्ज आहेत. तसंच ट्रिपल टेल पाइप्सचा देखील वापर करण्यात आला आहे.
New Civic Type R चं इंटिरिअर
न्यू सिविक टाइप आर कारच्या इंटिरिअरबाबत बोलायचं झालं तर यात होंडाच्या बॅजिंगसह एक स्टिअरिंग व्हील्स देण्यात आलं आहे. यात टाइप आणि स्पोर्ट्स सीट्सचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे खराब रस्त्यावरही आरामदायी प्रवास यातून करता येऊ शकतो असं इंटेरिअर देण्यात आलं आहे. तसंच यात एक डिजिटल इन्स्ट्रूमेंट कंन्सोल देण्यात आलं आहे.
New Civic Type R चं इंजिन पावर
New Civic Type R च्या इंजिनची माहिती याआधीच कंपनीनं दिली आहे. यात सध्याच्या तुलनेत नवं इंजिन अपग्रेड करण्यात आलं आहे. यात ३०६ बीएचपी पावरच्या २.० लीटरचं टर्बोचार्ज्ड इंजिन देण्यात आलं आहे.