अॅलॉय व्हीलच्या वापराने रस्त्यावर ठेवा तुमच्या कारच्या टायरची पकड मजबूत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 07:00 PM2017-10-09T19:00:00+5:302017-10-09T19:00:00+5:30
मिश्र धातूपासून तयार केलेले कारचे रिम ज्याला अॅलॉय व्हील म्हणून ओळकले जाते, ते सुबक, सौंदर्यात्मक व मजबूत असून आधुनिक कारचा सध्या तो आकर्षणाचा भाग मानला जातो
कारला अॅलॉय व्हील हे एकेकाळी खास श्रीमंती लक्षण समजले जायचे. प्रामुख्याने स्टील व्हील्सचा वापर सर्व कार्सना असे. आता अगदी कमी किंमतीच्या कारपासून अॅलॉय व्हीलचा वापर होऊ लागला आहे. ९, ८ ४ अशा विविध स्पोक्स म्हणजे आरी असणारी ही व्हील्स अॅल्युमिनियम, निकेल, मॅग्नेशियम या हलक्या धातूंच्या सहाय्यान किंवा त्यांच्या मिश्रणातून ही अॅलॉय व्हील्स बनवली जातात.
फिनिशिंग, वजना हलकी, चांगली मजबूत व कणखर अशी ही व्हील्स विशेष करून टायरला चांगली असतात तर ट्यूबलेस टायरला अॅलॉय व्हील्स हीच उत्तम असतात. ट्यूबलेस टायरच्या सध्याच्या जमान्यामध्ये अॅलॉय व्हीलसारखे दुसरे चांगले साधन नाही असे म्हणायला लागते. त्यावर टायर चांगला रूंद होऊन बसतो, काहीसा मोठा रुंदीचा टायरही लावल्याने अॅलॉय व्हील कारला रस्त्यावर चांगली मजबूत पकड देऊ शकतात. स्टील व्हील ही लोखंडाची असल्याने ती गंजण्याचा वा त्याला गंज घरण्याचा धोका अधिक असतो. तसा अॅलॉय व्हीलला तो नसतो, किंबहुना यासाठी टीकावूपणा त्याचा चांगला वाढतो. कारमध्ये एसयूव्ही, एमयूव्ही, हॅचबॅक, सेदान, कॉम्पक्ट एसयूव्ही अशा सर्वच प्रकारांमध्ये अॅलॉय व्हीलचा वापर होऊ लागला आहे.
मिश्र धातूंनी हे व्हील तयार केलेले असते. त्यात अन्य घटकही असतात. त्यामुळे व्हीलला जास्त मजबुती मिळत असते. तसेच ही व्हील्स सॉफ्ट असतात, तुकतुकीत बाह्यांगाची असतात. अॅलॉय व्हील खराब होतात तेव्हा ती अॅल्युमिनियम फॉइल व कोला यांनी साफ केल्यास अधिक नव्यासारखी दिसू लागतात. अॅलॉय व्हीलचा वापर केल्याने टायरच्या व विशेष करून ट्यूबलेस टायरला ग्रीप येते त्याचप्रमाणे वजनाला हलकी असल्याने गती पटकन घेतली जाते आणि कार थांबवतानाही अशा व्हीलचा उपयोग अधिक चांगला होतो. कारच्या हाताळणीमध्ये खूप चांगला फरक पडतो.
अॅलॉय व्हीलच्या या वैशिष्ट्याप्रमाणेच त्यांचे अधिक एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे त्यांची सौदर्यात्मक असणारी रचना. भारतात आज देशी व परदेशी बनावटीची आयात केलेली व्हील्स मिळत असून परदेशी बनावटीची रिम अधिक चांगली व वजनाला हलकी असूनही मजबूत मानली जातात. त्यातही मुख्य म्हणजे वैविध्यपूर्ण डिझाईनची व रंगाचीही अॅलॉयव्हील्स बाजारात उपलब्ध असून तुमच्या कारच्या रंगाला जुळणारी व्हीलस्ही तुम्ही घेऊ शकता. टायरलाही ती सूट होतात. टायरला या व्हीलमध्ये जशी मजबूत पकड मिळू शकते, तसेच या व्हीलवनर असताना टायरची रस्त्यावरील ग्रीप व व्हीलबेसही स्टील व्हीलच्या तुलनेत वाढलेला असतो. यामुळेच ही व्हील्स आता सर्वच कारना वापरण्याकडे कार उत्पादक कंपन्यांचा कल दिसू लागला आहे. त्यामुळे ग्राहकांचे आकर्षणही त्या प्रकारच्या व्हीलकडे आहे.