नवीन वर्षात 'या' गाड्या महागणार, कंपन्यांकडून दरवाढीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 07:25 PM2022-12-08T19:25:47+5:302022-12-08T19:26:54+5:30

सर्वसामान्यांच्या मारुती अल्टोपासून ते उच्चभ्रू लोकांच्या ऑडीपर्यंतच्या कारच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत.

alto to audi car price hike in january 2023 includes tata kia mg motor mercedes | नवीन वर्षात 'या' गाड्या महागणार, कंपन्यांकडून दरवाढीची घोषणा

नवीन वर्षात 'या' गाड्या महागणार, कंपन्यांकडून दरवाढीची घोषणा

googlenewsNext

नवी दिल्ली :  नवीन वर्ष महागाईचे असणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर आतापासून तुमचे बजेट थोडे वाढवा. याचे कारण म्हणजे 1 जानेवारीपासून अनेक कंपन्यांच्या कारच्या किमती वाढणार आहेत. सर्वसामान्यांच्या मारुती अल्टोपासून ते उच्चभ्रू लोकांच्या ऑडीपर्यंतच्या कारच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत. बहुतेक कंपन्यांनी जागतिक आव्हानांमुळे किंमत वाढवण्याचे कारण सांगितले आहे, तर चिपचे संकट देखील कायम आहे.

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki Car Price Hike) आपल्या संपूर्ण रेंजची किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे. ही वाढ वेगवेगळ्या मॉडेलनुसार ठरवली जाईल. कंपनी Alto, Alto K 10, Baleno, Brezza, Celerio, Ciaz, Dzire, Eeco, Ertiga, Grand Vitara, Ignis, S-Presso, Swift, Wagon R आणि XL6 च्या किमती वाढवणार आहे.

याचबरोबर,  टाटा मोटर्सने (Tata Motors Car Price Hike) देखील जानेवारी 2023 पासून किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये Altroz, Harrier, Nexon, Nexon EV, Punch, Safari, Tiago, Tiago EV, Tigor आणि Tigor EV सारख्या कारचा समावेश असू शकतो.

Kia ची कार 50,000 रुपयांनी महागणार
किआ इंडियाने जानेवारी 2023 पासून (Kia India Car Price Hike) आपल्या कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या सर्व रेंजची किंमत 50,000 रुपयांनी वाढणार आहे. ही वाढ 31 डिसेंबर 2022  नंतर केलेल्या बुकिंगसाठी लागू होणार आहे.

Audi च्या किमती 1.7 टक्क्यांपर्यंत वाढणार
लक्झरी कार निर्माता ऑडी इंडियाने (Audi Car Price Hike) 1 जानेवारीपासून आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती 1.7 टक्क्यांनी  वाढवण्याची घोषणा केली आहे. त्याच वेळी, मर्सिडीज बेंझ इंडियाच्या आणखी एका लक्झरी कार कंपनीने 5 टक्के दरवाढीची घोषणा केली आहे.

या कार कंपन्यांनीही केली घोषणा 
याशिवाय, बुधवारी रेनॉल्ट इंडियानेही (Renault Car Price Hike) आपल्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. मात्र,  Kwid, Triber आणि Kiger सारख्या गाड्या विकणाऱ्या Renault India ने अजून कोणत्या कारची किंमत किती वाढवणार हे सांगितलेले नाही. दुसरीकडे,  एमजी मोटर इंडियाने (MG Motor Car Price Hike) ने म्हटले आहे की,  लवकरच मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार कारच्या किमती दोन-तीन टक्क्यांनी वाढवल्या जातील.

Web Title: alto to audi car price hike in january 2023 includes tata kia mg motor mercedes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.