कार चोरी करण्याचा भन्नाट जुगाड; दरवाजावर ही वस्तू दिसली तर समजून जा... सापळा रचलाय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 12:58 PM2024-07-22T12:58:55+5:302024-07-22T12:59:06+5:30
कार चोर नवनवीन ट्रीक शोधत असतात. लोकांना ती समजेपर्यंत त्यांनी अनेक कार उडविलेल्या असतात. या कार वेगळ्या करून त्याचे सुटे भाग विकले जातात. यात अनेक लोकांचा हात असतो.
एवढी महागाई आहे तरीही देशात कार विक्रीचा आकडा काही खाली जात नाहीय. दर महिन्याला पावणे तीन ते तीन लाखांच्या आसपास कार विकल्या जातात. कधी विचार केलाय का, या कार कुठे ठेवल्या जात असतील. रस्त्यावर वाहतूक कोंडी काही अशीच वाढलेली नाही. यापैकी काही कारचे अपघात होतात तर काही कार चोरीला जातात. चोरांनी आता नवीन ट्रीक वापरायला सुरुवात केली आहे. तुम्ही सावध रहा...
कार चोर नवनवीन ट्रीक शोधत असतात. लोकांना ती समजेपर्यंत त्यांनी अनेक कार उडविलेल्या असतात. या कार वेगळ्या करून त्याचे सुटे भाग विकले जातात. यात अनेक लोकांचा हात असतो. आता या चोरीपासून कसे वाचायचे, असाच प्रश्न कार मालकाच्या डोक्यात असतो. जरा जरी चूक झाली तरी कार चोरीला जाऊ शकते. सर्व काळजी घेत असाल तर कारच्या दरवाजावरही लक्ष ठेवा.
कारच्या हँडलवर कॉईन वगैरे दिसला तर सावध व्हा. चोरांनी तुमच्या कारसाठी सापळा रचला आहे. तुम्ही विचार करत असाल की एका शिक्क्याने काय होते, तुम्ही हा शिक्का दिसला की तो उचला आणि फेकून द्या. कारण या शिक्क्यामुळे कार आरामात चोरी होऊ शकते.
कारमध्ये सेंट्रल लॉकिंग सिस्टिम असते. चावीच्या एका बटनावर कार लॉक अनलॉक होते. जेव्हा तुम्ही कार पार्क करता व नेतेवेळी अनलॉक करता तेव्हा कारच्या चारही दरवाजांचे हँडल चेक करा. कारण तिथे चोर कॉईन ठेवतात. तुम्ही कार नेली की ते कारचा पाठलाग करतात. तुम्ही कारमधून उतरताना लॉक करता. परंतू कार लॉक होत नाही. तुम्ही निघून जाता व चोराचे काम झालेले असते. कार चोरीच्या ट्रीक बाबतची माहिती अमर उजालाने दिली आहे.