लवकरच भारतात लाँच होऊ शकतात 'या' शानदार बाईक्स; जाणून घ्या फीचर्स... 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 02:33 PM2022-10-08T14:33:57+5:302022-10-08T14:34:24+5:30

Upcoming Bikes in India: बजाजची नवीन बाईक Pulsar N150, टीव्हीएस iQube ST, कीव्ही रेट्रो स्ट्रीट आणि डुकाटी यांचा समावेश आहे. या आगामी बाईकच्या फीचर्सबद्दल जाणून घ्या...

amazing two wheeler may launch with amazing price and features check the list | लवकरच भारतात लाँच होऊ शकतात 'या' शानदार बाईक्स; जाणून घ्या फीचर्स... 

लवकरच भारतात लाँच होऊ शकतात 'या' शानदार बाईक्स; जाणून घ्या फीचर्स... 

Next

नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून ऑटो सेक्टरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. हे पाहता अनेक कंपन्यांना आपली वाहने लवकरात लवकर बाजारात आणायची आहेत, जेणेकरून त्यांनाही चांगला नफा घेता येईल. यामध्ये बजाजची नवीन बाईक Pulsar N150, टीव्हीएस iQube ST, कीव्ही रेट्रो स्ट्रीट आणि डुकाटी यांचा समावेश आहे. या आगामी बाईकच्या फीचर्सबद्दल जाणून घ्या...

बजाज पल्सर एन 150
बजाज आपल्या पल्सरमध्ये नेहमी अपडेट करत असते. कंपनी Pulsar N160 नंतर आता लवकरच Pulsar N150 लाँच करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन बाईकच्या डिझाईनमध्ये कोणतेही विशेष बदल न करता ती  Pulsar N160 प्रमाणे ठेवण्याची शक्यता आहे. या आगामी बाईकमध्ये अधिक शक्तिशाली इंजिन पाहायला मिळू शकते. मात्र, कंपनीकडून अद्याप अशी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

टीव्हीएस आयक्यूब एसटी
मिळालेल्या माहितीनुसार, टीव्हीएस या महिन्याच्या अखेरीस iQube इलेक्ट्रिकचे पुढील व्हेरिएंट  iQube ST लाँच करू शकते. कंपनीने काही महिन्यांपूर्वीच ही माहिती दिली आहे. आगामी नवीन मॉडेलमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. या बाईकमध्ये केलेल्या बदलांमुळे या बाईकची किंमत जवळपास 1.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

कीव्ही रेट्रो स्ट्रीट
अलीकडेच चीनच्या बाईक उत्पादक Zontes ने भारतात एकाच वेळी पाच बाईक लाँच केल्या आहेत. त्याचबरोबर, चीनची Keeway कंपनी देखील भारतीय दुचाकी बाजारात आपला हात आजमावण्याच्या तयारीत आहे. कंपनी लवकरच तिचे Keeway Retro Street 125 आणि Keeway Retro Street 250 भारतात लाँच करू शकते. किमतीबद्दल बोलायचे झाले तर Keeway Retro Street ची किंमत जवळपास 4 लाख असू शकते. मात्र, कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

डुकाटी बाईक
डुकाटी आपल्या महागड्या आणि लक्झरी बाइक्ससाठी ओळखली जाते. कंपनी ऑक्टोबरमध्ये भारतात Ducati Multistrada V4 Pikes Peak बाईक लाँच करू शकते. या बाईकच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, तिची सुरुवातीची किंमत सुमारे 28 लाख रुपये असू शकते. बाईकचे वजन सुमारे 215 kg आहे. यामध्ये 1158cc ग्रां टुरिस्मो V4 इंजिन वापरण्यात आले आहे, जे 170 PS आणि 125 Nm टॉर्क निर्माण करेल.

Web Title: amazing two wheeler may launch with amazing price and features check the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.