Mahindra ची कमाल! कंपनी आणतेय भन्नाट इलेक्ट्रिक कार; १२ सेकंदात ३०० किमीचा वेग, रेंज किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 04:16 PM2022-01-02T16:16:17+5:302022-01-02T16:18:14+5:30

या कारचा पहिला प्रोटोटाइप २०१९ च्या जिनिव्हा ऑटो शोमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.

anand mahindra and mahindra to bring pininfarina battista electric car pick up 300 km in 12 second | Mahindra ची कमाल! कंपनी आणतेय भन्नाट इलेक्ट्रिक कार; १२ सेकंदात ३०० किमीचा वेग, रेंज किती?

Mahindra ची कमाल! कंपनी आणतेय भन्नाट इलेक्ट्रिक कार; १२ सेकंदात ३०० किमीचा वेग, रेंज किती?

Next

नवी दिल्ली: गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कारचा मोठा बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक कार सादर करत आहे. आताच्या घडीला इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटा नंबर वनवर आहे. यातच आता महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीनेही इलेक्ट्रिक कार सादर करणार असल्याचे म्हटले होते. 

महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी लवकरच जर्मन Pininfarina या इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनीच्या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार Battista चे उत्पादन सुरू करणार आहे. कंपनीने यासाठी निधी उभारण्यासाठी पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. Battista ही हायपर इलेक्ट्रिक कार आहे. या कारचा पहिला प्रोटोटाइप २०१९ च्या जिनिव्हा ऑटो शोमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या इलेक्ट्रिक कारची टॉप स्पीड ३५० किमी प्रति तास आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केले फोटो

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. आनंद महिंद्रा यांनी केवळ १२ सेकंदात ३०० किमीचा वेग पकडणाऱ्या अशा शानदार इलेक्ट्रिक कारचे फोटो शेअर केले आहेत. पिनिनफारिना बॅटिस्टा इलेक्ट्रिक कारमध्ये १२० किलोवॅटची लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. ही कार १९०० एचपी पॉवर जनरेट करते. या कारमध्ये चार इलेक्ट्रिक मोटर्स असून कारच्या चार चाकांना वेगवेगळी ऊर्जा पुरवतात. कंपनीच्या दाव्यानुसार, पिनिनफारिना बॅटिस्टा केवळ २ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग वाढवते. १२ सेकंदात ३०० किमी प्रतितास वेग गाठू शकतो. या इलेक्ट्रिक कारचा टॉप स्पीड ३५० किमी प्रतितास आहे. पिनिनफारिना बॅटिस्टा इलेक्ट्रिक कारची किंमत सुमारे २२ लाख डॉलर (जवळपास १६.३५ कोटी रुपये) आहे. 

दरम्यान, Pininfarina Battista इलेक्ट्रिक कार एका चार्जवर ५०० किमीपर्यंत जाऊ शकते. कंपनी या कारचे फक्त १५० युनिट्स बनवणार असून, जगभरातील बाजारात विकले जाणार आहेत. या कारचे ५० युनिट्स युरोपमध्ये, ५० युनिट्स अमेरिकेत आणि ५० युनिट्स पश्चिम आशिया आणि आशियाई मार्केटमध्ये विकले जातील. सध्या अमेरिका आणि युरोपमधील रस्ते आणि ट्रॅकवर चाचणी सुरू आहे, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. 
 

Web Title: anand mahindra and mahindra to bring pininfarina battista electric car pick up 300 km in 12 second

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.