Mahindra Scorpio Safety Rating: महिंद्राच्या स्कॉर्पिओला किती सेफ्टी रेटिंग; दीप सिद्धूच्या अपघातामुळे आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 09:53 PM2022-02-16T21:53:54+5:302022-02-16T21:56:30+5:30

Mahindra Scorpio Safety Rating: मंगळवारी रात्री दीप सिद्धूच्या कारला अपघात झाला. या अपघातात दीप सिद्धू याचा मृत्यू झाला. त्याची मैत्रिण गंभीर जखमी झाली आहे. अपघाती मृत्यूनंतर स्कॉर्पिओ अचानक चर्चेत आली आहे. 

Anand Mahindra: Mahindra Scorpio Safety Rating is zero in Gncap: Deep Sidhu was driving the same car accident death | Mahindra Scorpio Safety Rating: महिंद्राच्या स्कॉर्पिओला किती सेफ्टी रेटिंग; दीप सिद्धूच्या अपघातामुळे आली चर्चेत

Mahindra Scorpio Safety Rating: महिंद्राच्या स्कॉर्पिओला किती सेफ्टी रेटिंग; दीप सिद्धूच्या अपघातामुळे आली चर्चेत

googlenewsNext

सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असणाऱ्या आनंद महिंद्रांची कंपनी महिंद्रा आणि महिंद्राची दणकट एसयुव्ही स्कॉर्पिओ किती सुरक्षित आहे, यावर आज चर्चा सुरु आहे. स्कॉर्पिओचे नवे मॉडेल लवकरच लाँच केले जाणार आहे. अशावेळी या एसयुव्हीला किती सेफ्टी रेटिंग मिळालेले आहे, ऐकून धक्का बसेल. पंजाबी अॅक्टर दीप सिद्धू याच्या अपघाती मृत्यूनंतर स्कॉर्पिओ अचानक चर्चेत आली आहे. 

महिंद्राची सर्वात नवी एसयुव्ही XUV700ला फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहेत. तर महिंद्राची आणखी एक कार फाईव्ह स्टार रेटिंगची आहे. परंतू महिंद्राच्या स्कॉर्पिओला (Mahindra Scorpio) झिरो स्टार सेफ्टी रेटिंग (Safety Rating) मिळालेले आहेत. स्कॉर्पिओला ग्लोबल एनकॅपमध्ये अॅडल्टसाठी मोठा भोपळा मिळालेला आहे. तर लहान मुलांच्या सुरक्षेसाठी दोन स्टार मिळालेले आहेत. 

मंगळवारी रात्री दीप सिद्धूच्या कारला अपघात झाला. या अपघातात दीप सिद्धू याचा मृत्यू झाला. त्याची मैत्रिण गंभीर जखमी झाली आहे. दीप सिद्धूची कार ट्रकवर जाऊन आदळली. यामध्ये कारच्या ड्रायव्हर साईडचा चकनाचूर झाला आहे. ही कार महिंद्राची स्कॉर्पिओ आहे. यामुळे आज ही कार जास्त चर्चेत आली आहे. 

Web Title: Anand Mahindra: Mahindra Scorpio Safety Rating is zero in Gncap: Deep Sidhu was driving the same car accident death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.