Mahindra Truck Bus: आनंद महिंद्रांच्या कंपनीचे चॅलेंज! इतरांपेक्षा जास्त मायलेज मिळाले नाही तर ट्रक माघारी द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 09:57 AM2022-01-18T09:57:13+5:302022-01-18T09:57:31+5:30

Mahindra Truck Bus: महिंद्राच्या ट्रक आणि बस डिव्हिजनने ही मोहीम सुरु केली आहे. 'Get More Mileage or Give Truck Back' असे या मोहिमेचे नाव आहे.

Anand Mahindra's Company Challenge! Get More Mileage or Give Truck Back | Mahindra Truck Bus: आनंद महिंद्रांच्या कंपनीचे चॅलेंज! इतरांपेक्षा जास्त मायलेज मिळाले नाही तर ट्रक माघारी द्या

Mahindra Truck Bus: आनंद महिंद्रांच्या कंपनीचे चॅलेंज! इतरांपेक्षा जास्त मायलेज मिळाले नाही तर ट्रक माघारी द्या

googlenewsNext

देशातील प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी महिंद्रा आणि महिंद्राने त्यांच्या मालवाहू ट्रकच्या मायलेजवरून (Truck Mileage) मोठे चॅलेंज दिले आहे. कंपनीने दावा केला आहे की, त्यांचे ट्रक इतर कंपन्यांच्या ट्रकच्या तुलनेत जास्त मायलेज देतात. एवढेच नाही तर या दाव्यासोबत एक भन्नाट चॅलेंजही दिले आहे. आमच्या ट्रकपेक्षा कोणाच्या ट्रकने जास्त मायलेज दिले तर आमचा ट्रक आम्ही परत घेणार, असे कंपनीने म्हटले आहे. 

महिंद्राच्या ट्रक आणि बस डिव्हिजनने ही मोहीम सुरु केली आहे. 'Get More Mileage or Give Truck Back' असे या मोहिमेचे नाव आहे. इतरांपेक्षा जास्त मायलेज देण्याची गॅरंटी कंपनीने बीएस ६ श्रेणीतील सर्व ट्रकवर दिली आहे. ही मोहिम कंपनीने २०१६ मध्ये सुरु केली होती. परंतू तेव्हा ती फक्त Balzo सीरिजच्या ट्रकसाठी होती. आता कंपनीने सर्वच ट्रकवर हे चॅलेन्ज देण्यास सुरुवात केली आहे. 

ही गॅरंटी छोट्या ते मोठ्या ट्रकवर देण्यात आली आहे. महिंद्रा ३.५ टन ते ५५ टन ट्रक विकते. महिंद्राकडे HCV Blazo X, ICV Furio, LCV Furio 7 आणि LCV Jayo ट्रक आहेत. एका रिपोर्टनुसार कमर्शिअल व्हेईकल मार्केटमध्ये महिंद्रा चौथ्या स्थानावर आहे. कंपनी बाजारातील हिस्सा ४ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर करण्याच्या प्रयत्नात आहे. 

सध्या डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. यामुळे जास्त मायलेज मिळाले तर ग्राहकांचे पैसे वाचणार आहेत. या गॅरंटीसाठी यापेक्षा चांगला काळ कोणता असूच शकत नाही. यामुळे ग्राहकांचा महिंद्रावरील विश्वास वाढेल. इंधनाचा खर्च हा वाहन मालकांच्या एकूण खर्चाच्या ६० टक्क्यांहून जास्त असतो. तिथे पैसे वाचले तर त्यांचा फायदाच आहे, असे कंपनीने म्हटले आहे. 

Web Title: Anand Mahindra's Company Challenge! Get More Mileage or Give Truck Back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.