Electric Scooter Fire : फायर स्कूटर… पुन्हा एकदा या कंपनीच्या इलेक्ट्रीक स्कूटरला आग, चार्जिगदरम्यान बॅटरीचा स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 11:18 PM2022-06-17T23:18:54+5:302022-06-17T23:19:21+5:30
काही दिवसांपूर्वी इलेक्ट्रीक स्कूटर्सना आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या
काही दिवसांपूर्वी इलेक्ट्रीक स्कूटर्सना आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यातच आता पुन्हा एकदा इलेक्ट्रीक स्कूटरला आग लागल्याची घटना समोर आली आहे. गुरूवारी गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील एका इमारतीत प्योर ईव्हीची इलेक्ट्रीक स्कूटर चार्जिंग लावण्यात आली होती. त्याच वेळी या स्कूटरला आग लागली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ही स्कूटर चार्जरद्वारे प्लग केल्याचं दिसत आहे. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
कंपनीकडून याबाबत कोणतंही वक्तव्य जारी करण्यात आलेलं नाही. प्योर इव्हीच्या स्कूटरला आग लागण्याची ही पाचवी घटना आहे. यापूर्वी देशातील निरनिराळ्या भागात अशा घटना घडल्या होत्या. यापूर्वीही गेल्या महिन्यात हैदराबादमध्ये प्योर इव्हीच्या स्कूटरला आग लागण्याची घटना घडली होती.
दरम्यान, कंपनीनं यापूर्वी आपल्या २ हजार स्कूटर परत मागवल्या होत्या. यापूर्वी ओलाच्या स्कूटरलाही आग लागल्याची घटना घडली होती. इलेक्ट्रीक टू-व्हीलरमधील आग आणि स्फोटाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, दुचाकी EV वाहनांसाठी EV बॅटरी मानके (BIS मानक) लागू करण्याची सरकारची योजना आहे. कालांतरानं ती चारचाकी वाहनांसाठी देखील लागू केली जाईल.