आनंद महिंद्रांच्या प्रश्नाला उत्तर दिले अन् दोन एसयुव्ही जिंकल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 02:20 PM2019-09-19T14:20:54+5:302019-09-19T14:22:50+5:30

महिंद्रा यांनी एका बसचा फोटो टाकला होता. ही बस साधारण नव्हती तर तिला वरच्या बाजुलाही चाके असल्यासारखे बनविण्यात आले होते.

Answered Anand Mahindra's question on twitter and won two SUV's | आनंद महिंद्रांच्या प्रश्नाला उत्तर दिले अन् दोन एसयुव्ही जिंकल्या

आनंद महिंद्रांच्या प्रश्नाला उत्तर दिले अन् दोन एसयुव्ही जिंकल्या

Next

मुंबई : महिंद्रा आणि महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा हे सोशल मिडीयावर कमालीचे कार्यरत असतात. हजरजबाबी प्रतिक्रिया देण्यातही पुढे असतात. नुकतेच त्यांनी ट्विटरवर एक फोटो टाकून त्याचे भावनारे कॅप्शन सुचविणाऱ्या दोघांना एसयुव्ही कार भेट देण्याचे आश्वासन दिले होते. आज त्यांनी या विजेत्यांची नावे घोषित केली आहेत.


महिंद्रा यांनी एका बसचा फोटो टाकला होता. ही बस साधारण नव्हती तर तिला वरच्या बाजुलाही चाके असल्यासारखे बनविण्यात आले होते. त्यांनी हा फोटो ट्विट करताना त्यांनी म्हटले की, मी नजीकच्या काळात कॅप्शन स्पर्धा घेतली नाही. या स्पर्धेसाठी हा अजबगजब बसचा फोटो अगदी योग्य आहे. फोटो ओळ इंग्रजी, हिंदी किंवा हिंग्लिशमध्ये देता येईल. उद्या सकाळी (बुधवार) 10 वाजेपर्यंत वेळ आहे. नेहमीप्रमाणे दोन विजेत्यांना महिंद्रा कंपनीचे एक डाई-कास्ट स्केल मॉडेल दिले जाईल. 



यावर नेटकऱ्यांनी पटापट उड्या मारताना 28.1 हजार जणांनी कॅप्शन दिले होते. तर 14 हजार जणांनी लाईक केले होते. एवढा मोठा प्रतिसाद मिळविणारे आनंद महिंद्रा हे भारतातील पहिलेच उद्योजक आहेत. या स्पर्धेचा निकाल महिंद्रांनी आज जाहीर केला असून दोन विजेत्यांची नावेही घोषित केली आहेत. 


पहिला विजेता भूपेश कुमार असून त्याने या बसच्या फोटोसाठी "Hangover Bus" कॅप्शन दिले आहे. या विजेत्याला स्कॉर्पिओ मिळणार आहे. 


तर दुसरा विजेता राकेश असून त्याने 'SUB की BUS' असे कॅप्शन दिले होते. 


महिंद्रा कंपनी तिच्या एसयुव्ही कारसाठी प्रसिद्ध आहे. महिंद्राकडे सध्या तीन एसयुव्ही आहेत. स्कॉर्पिओ ही एसयुव्ही मोठी लोकप्रिय आहे. तर थार ही जीपही लोकप्रिय आहे. यानंतर महिंद्राच्या ताफ्यात एक्सयुव्ही 500 ही मोठी कार आहे. 
 

Web Title: Answered Anand Mahindra's question on twitter and won two SUV's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.