प्रखर प्रकाशापासून वाहन चालकाला दिलासा देणारे अॅन्टीग्लेअर व्हायझर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 08:00 AM2017-12-06T08:00:00+5:302017-12-06T08:00:00+5:30

वाहन चालवताना प्रखर सूर्यप्रकाश व रात्री समोरच्या वाहनाचे प्रखर हेडलॅम्प यांचा त्रास टाळण्यासाठी अॅन्टीग्लेअर व्हायझर मिळतात. पण ते घेताना अनेक बाबींचा विचार केला जाणे गरजेचे आहे.

Antigler freighter that provides relief to the driver from intense lighting | प्रखर प्रकाशापासून वाहन चालकाला दिलासा देणारे अॅन्टीग्लेअर व्हायझर

प्रखर प्रकाशापासून वाहन चालकाला दिलासा देणारे अॅन्टीग्लेअर व्हायझर

Next

वाहन चालवताना प्रखर सूर्यप्रकाश व रात्री समोरच्या वाहनाचे प्रखर हेडलॅम्प यांचा त्रास टाळण्यासाठी अॅन्टीग्लेअर व्हायझर मिळतात. पण ते घेताना अनेक बाबींचा विचार केला जाणे गरजेचे आहे. कारण प्रश्न शेवटी डोळ्यांचा व सुरक्षित वाहनचालनाचा आहे.
---
भारतातील वातावरण, रस्ते, त्यांचे प्रकार, वाहतूक हे तसे प्रदेशानुसार भिन्न आहे. त्यामुळे वाहन चालवण्यामध्येही फरक आढळून येतात. जसे चालवण्यातील फरक आढळतात तसेच वाहन चालवण्यामध्येही अनुभव वेगवेगळे येतात. काही ठिकाणी दमट, काही ठिकाणी उष्ण तर काही ठिकाणी शीत वा बर्फाच्छादित प्रदेशाचे वातावरण असते. तसेच रात्रीच्यावेळीही रस्त्यांनुसार समोरच्या वाहनाचा प्रकाश डोळ्यावर येण्याचे प्रमाण व पद्धतीही काहीशा वेगवेगळ्या असल्याचे आढळून येते. अशा स्थितीत चालकाच्या डोळ्यांनाही त्रास होत असतो. उन्हाच्या प्रखरतेत कार चालवताना होणारा त्रास प्रत्येकाला सहन होत नाही, काहींना त्याची सवयही झालेली असते. तसेच रात्रीचे वाहन चालवणेही असते. 

घाट रस्त्यांमध्ये डोळ्यावर येणारा समोरच्या वाहनाच्या हेडलॅम्पचा प्रकाश व सरळ रस्त्यावर असताना डोळ्यावर येणारा प्रकाश याच्या प्रमाणात फरक पडतो. अशा भिन्न स्थितीला अनेकदा सामोरे जावे लागत असते. व्यावसायिक ड्रायव्हर्सना अशा साऱ्या स्थितीची सवय झालेली असते. दिवसानंतर रात्री वाहन चालवणे व रात्रीनंतर दिवसाही वाहन चालवणे त्यांना जमते. मात्र सर्वांनाच हे जमत नाही. दुसरी बाब म्हणजे ड्रायव्हिंग फटिगची व ड्रायव्हिंगचे काम झाल्यानंतर दुसरे काम करण्याचा तणाव वा जाण. यामुळे वाहन चालवताना डोळ्यावर येणारा ताण कमी करणे अनेकांना आवश्यक असते. यासाठी डोळ्यावर गॉगल लावणे, चष्मा असल्यास अॅन्टीग्लेअरचा वापरणे, मध्ये मध्ये डोळ्यांना विस्रांती देणे, थंड पाण्याचा हबका मारणे गरजेचे आहे.त्याचप्रमाणे सतत लांबचे ड्रायव्हिंग करायचे असेल तर अॅन्टी ग्लेअर व्हायझरही बाजारात मिळतात. 

विशेष करून ई-कॉमर्सच्या ऑनलाइन साइटवर त्यांचे अनेक प्रकारही दिसतात. काही चष्मे असतात तर काही गाडीतील सन व्हायझरवर संलग्न करण्यासाठी असलेल्या अॅक्रेलिक वा प्लॅस्टिकबेस काचाही असतात. त्या घेताना मात्र अतिशय सावधानपणे घ्याव्यात. किंमतीच्या तुलनेत, व कंपनीच्या तुलनेत त्यामध्ये फरक असतो.सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी करमारी ही व्हायझरची पट्टी पिवळसर रंगाची असते, तर रात्रीच्यावेळी समोरच्या गाडीच्या हेडलॅम्पची तीव्रता कमी करणारी ही व्हायझरची पट्टी काहीशा राखाडी पांढुरक्या रंगाची असते.कंपन्यांनी त्याबाबत अनेक दावेही केलेले दिसत असतात. 

मात्र आपल्याला काय योग्य वाटते ते ज्याचे त्याने ठरवायचे असते. या दोन्ही बाबी भारतात तयार होत नाहीत. त्या परदेशी बनावटीच्या असून त्यामधील चांगल्या व्हायझरचा जरी विचार केला तरी त्या भारतीय वातावरणात जवळीक साधू शकतील वा जुळवून घेऊ शकतील, याची मात्र खात्री देता येत नाही. तसेच काही चांगल्या कंपन्यांनी केलेल्या उत्पादनाच्या आधारे बोगस कंपन्या व कमी दर्जाच्या उत्पादनांचाही समावेश असामध्ये असू शकतो. विशेष करून अशा बाबी ऑनलाइन घेण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहून वा रकोणी घेतलेल्या असल्यास त्या पडताळून पाहून मगच त्या विकत घेण्याचा विचार करावा. काही झाले तरी प्रश्न तुमच्या डोळ्यासारख्या नाजूक भागाशी निगडित आहे व त्यातही ड्रायव्हिंगसारख्या महत्त्वाच्या दक्ष अशा कामाशी निगडित असतो. ऑनलाइनवर या अगदी ४०० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंत विकत असलेल्या दिसून येते. मात्र किंमतीच्या व दर्जाच्या विचाराबरोबरच त्या तुम्हाला किती योग्य आहेत वा नाहीत ते तुमचे तुम्हीच ठरवायचे आहे. मात्र अशा प्रकारच्या वस्तू घेताना वयाची चाळीशी ओलांडलेल्यांनी नक्कीच डोळ्याच्या डॉक्टरांचाही सल्ला घ्यावा हे उत्तम. अन्यथा सूर्यप्रकाशात वाहन चालवताना डोळ्यावर नेहमीचा गॉगल लावावा आणि रात्रीचे वाहन चालन करू नये किंवा काळजीपूर्वक करावे.

Web Title: Antigler freighter that provides relief to the driver from intense lighting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.