एकच नंबर! आता Apple ची इलेक्ट्रीक कार येणार, विना स्टेअरिंग अन् पॅडलनं चालणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 09:56 AM2022-12-08T09:56:36+5:302022-12-08T09:57:30+5:30

Apple Electric Car: आयफोन स्मार्टफोन निर्माती कंपनी Apple आता सेल्फ-ड्रायव्हिंग इलेक्ट्रिक कार बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

apple electric car self driving no steering pedals after iphone postponed will be launched | एकच नंबर! आता Apple ची इलेक्ट्रीक कार येणार, विना स्टेअरिंग अन् पॅडलनं चालणार?

एकच नंबर! आता Apple ची इलेक्ट्रीक कार येणार, विना स्टेअरिंग अन् पॅडलनं चालणार?

Next

Apple Electric Car: आयफोन स्मार्टफोन निर्माती कंपनी Apple आता सेल्फ-ड्रायव्हिंग इलेक्ट्रिक कार बनवण्याचा प्रयत्न करत आहे. टायटन असे या प्रकल्पाचे नाव आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनीनं इलेक्ट्रिक कारची योजना २०२६ पर्यंत पुढे ढकलली आहे. ही कार स्टीयरिंग व्हील आणि पेडल्सशिवाय बनवावी अशी कंपनीची इच्छा आहे. अ‍ॅपलच्या व्हिजननुसार ही कार तयार करण्यासाठी कंपनीचे अधिकारी मेहनत घेत आहेत. सध्याचं तंत्रज्ञान पाहता स्टीयरिंग व्हील आणि पेडल्सशिवाय कार बनवणे जवळजवळ अशक्य आहे.

Apple इलेक्ट्रिक कार बनवण्यासाठी आता कंपनी आपल्या अविश्वसनीय स्वप्नांशी थोडी तडजोड करुन नव्या डिझाइनसह पुढे जाण्याचा विचार करत आहे. या डिझाइनमध्ये स्टिअरिंग व्हील आणि पेडल्सचाही समावेश असेल. आगामी कार केवळ महामार्गांवर स्वयंचलित ड्रायव्हिंगला सपोर्ट करेल. सुरुवातीला कंपनीला लेव्हल ५ ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग कार सादर करायची होती. पण कंपनीला यात अद्याप यश मिळू शकलेलं नाही.

Apple कार: ड्रायव्हर खेळेल गेम
Apple चा टायटन प्रकल्प चार वर्ष जूना आहे. आता हा प्रकल्प कंपनीच्या तंत्रज्ञानाची चाचणी घेत आहे. मात्र, आगामी काळात आगामी इलेक्ट्रिक कार अ‍ॅपलला चांगला नफा देण्याची शक्यता आहे. अ‍ॅपलला अशी कार बनवायची आहे ज्यामध्ये ड्रायव्हर हायवेवर अगदी बिनदिक्कतपणे चित्रपट पाहणं किंवा गेम खेळू शकतो. त्याच वेळी, गर्दीच्या ठिकाणी, ही कार ड्रायव्हरला मॅन्युअल कंट्रोल घेण्यासाठी वेळीच सावध करेल.

पावरफुल चिप सेटसह येणार Apple Car
कंपनी प्रथम उत्तर अमेरिकेत ही कार लॉन्च करणार आहे. यानंतर, कालांतराने कारमध्ये सुधारणा करताना इतर ठिकाणी देखील विक्री केली जाईल. अ‍ॅपलच्या कारला कंपनीच्या पॉवरफुल कॉम्प्युटरचा सपोर्ट मिळेल, ज्याचं कोडनेम डेनाली असणार आहे. ब्लूमबर्गच्या मते, त्याच्या प्रोसेसरची कार्यक्षमता ऍपलच्या सर्वात मजबूत मॅक चिपशी तुलना करता येऊ शकते.

Apple Car: २०२५ मध्ये येईल प्रोटोटाइप
सध्या ही चिप अ‍ॅडव्हान्स स्टेजमध्ये असल्याचं सांगण्यात आलं आहे, म्हणजेच त्याचं उत्पादन लवकरच सुरू होऊ शकते. टेस्लाही अशाच प्रकारे प्रयत्न करत आहे. Apple कडे अद्याप ठोस डिझाइन नाही. कार सध्या प्रोटोटाइप टप्प्यात असून तिची चाचणी २०२५ मध्ये केली जाऊ शकते.

Web Title: apple electric car self driving no steering pedals after iphone postponed will be launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Apple Incअॅपल