१ एप्रिल! टाटा मोटर्स मोठा झटका देणार; वाहनांच्या किंमती 5 टक्क्यांनी वाढविण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 11:01 AM2023-03-22T11:01:23+5:302023-03-22T11:02:35+5:30

आधीच पेट्रोल, डिझेल महागलेले आहे. महागाईमुळे वाहनांच्या किंमतीदेखील गगनाला भिडल्या आहेत.

April 1st! Tata Motors will give a big blow; Announcement of increase in prices of vehicles | १ एप्रिल! टाटा मोटर्स मोठा झटका देणार; वाहनांच्या किंमती 5 टक्क्यांनी वाढविण्याची घोषणा

१ एप्रिल! टाटा मोटर्स मोठा झटका देणार; वाहनांच्या किंमती 5 टक्क्यांनी वाढविण्याची घोषणा

googlenewsNext

१ एप्रिलला नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होणार आहे. यामुळे या तारखेपासून विविध क्षेत्रात, गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. असे असताना टाटा मोटर्सने ग्राहकांना मोठा झटका देण्याची तयारी केली आहे. टाटा मोटर्स व्यावसायिक वाहनांच्या किंतीत मोठी वाढ करणार आहे. 

आधीच पेट्रोल, डिझेल महागलेले आहे. महागाईमुळे वाहनांच्या किंमतीदेखील गगनाला भिडल्या आहेत. असे असताना टाटा मोटर्सने बीएस ६ चा दुसरा टप्पा लागू होणार म्हणून वाहनांच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा मोटर्स ही भारतातील सर्वात मोठी व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनी १ एप्रिल २०२३ पासून त्‍यांच्‍या व्‍यावसायिक वाहनांच्‍या किंमतीत जवळपास ५ टक्‍क्‍यांची वाढ करणार आहे.

बीएस-६ फेज २ उत्सर्जन नियमांचे पालन करताना कंपनीचा खर्च वाढला आहे. या मानकांची पूर्तता करण्यासाठी टाटा मोटर्सने आपल्या संपूर्ण वाहन पोर्टफोलिओमध्ये बदल केला आहे. किंमतीतील वाढ ही व्यावसायिक वाहनांवर लागू केली असून अद्याप कार, एसयुव्हींबाबतची माहिती समोर आलेली नाही. परंतू कार आणि एसयुव्ही देखील महाग होण्याची शक्यता आहे. अन्य कंपन्यादेखील त्यांच्या कारच्या किंमती वाढविण्याचा विचार करत आहेत.

हॅरियर आणि सफारीचे 26  व्हेरिएंट बंद 
आतापर्यंत हॅरियरचे 30 व्हेरिएंट येत होते आणि सफारीचे 36 व्हेरिएंट येत होते. हॅरियर आणि सफारीचे एकूण 66 व्हेरिएंट ऑफरवर होते. आता यातील 26  व्हेरिएंट बंद करण्यात आले आहेत. हॅरियर लाइनअपमध्ये रेड डार्क एडिशनचे 2 नवीन व्हेरिएंट जोडण्यात आले आहेत. यासह, आता हॅरियरच्या एकूण व्हेरिएंटची संख्या 20 झाली आहे. याचबरोबर, सफारीला 4 नवीन रेड डार्क व्हेरिएंट मिळाले आहेत, ज्यामुळे सफारीच्या व्हेरिएंटची संख्या 26 झाली आहे.
 

Web Title: April 1st! Tata Motors will give a big blow; Announcement of increase in prices of vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tataटाटा