Volkswagen चे नाव बदलणार! कंपनीने जाहीरही केले, पण... एप्रिल फूल अंगलट येण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 03:52 PM2021-04-01T15:52:58+5:302021-04-01T16:02:07+5:30
Volkswagen April fool news: Volkswagen कंपनीने अधिकृत मेल आयडीवरून मीडियाला एक मेल पाठविला. यामध्ये कंपनीचे नाव बदलणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या एप्रिल फूल न्यूजमुळे कंपनीचे शेअर 5 टक्क्यांनी वधारले होते.
जर्मनीची प्रसिद्ध ऑटोमेकर कंपनी फोक्सवॅगन (Volkswagen) ने अमेरिकेमधील प्रसारमाध्यमांना एप्रिल फूल (April fool) बनवून टाकले आहे. मात्र, हा प्रकार आता कंपनीच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे. Volkswagen कंपनीने अधिकृत मेलवरून मीडियाला एक मेल पाठविला. यामध्ये कंपनीचे नाव बदलणार असल्याचे जाहीर करण्यात आले. एवढेच नाही तर अमेरिकेतील सीईओने मुलाखत देखील देऊन टाकली. वाचा काय झाले पुढे....
आता सीईओ स्वत: सांगतोय म्हटल्यावर प्रसारमाध्यमांनी याच्या बातम्याही प्रसिद्ध केल्या. परंतू आज कंपनीने त्यांना पुन्हा मेल करून हे एप्रिल फूल होते असे सांगितल्याने खळबळ उडाली आहे. (Volkswagen's April Fool's joke of Rename in America backfires disastrously)
अमेरिकेत सोमवारी Volkswagen ने एक न्यूज रिलीज पाठविले. यामध्ये कंपनी आपले नाव बदलत असल्याचे म्हटले. मंगळवारी कंपनीने पत्रकारांना मेलही पाठविला आणि ही न्यूज रिलीज खरी असल्याचे सांगितले. यामुळे अमेरिकी मीडियाने ते खरे मानून त्यावर बातम्याही चालविल्या. Volkswagen of America चे सीईओ स्कॉट केओग यांनी मुसाखतही दिला त्यामध्ये त्यांनी Volkswagen मधील K च्या जागी T बदलला जाणार असल्याचे सांगितले.
म्हणजेच Volkswagen चे Voltswagen नाव केले जाणार असल्याचे जाहीर केले. मात्र, आम्ही एक गोष्ट बदलणार नसल्याचे त्यांनी सांगितले, ती म्हणजे सर्वात चांगले वाहन बनविण्याबाबतची प्रतिबद्धता. हे इलेक्ट्रीक वाहनांसाठी करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले होते.
यानंतर मंगळवारीच कंपनीने हे एप्रिल फूल असल्याचे जाहीर केले. आता हे एप्रिल फूल कंपनीला भारी पडण्याची शक्यता आहे. कारण कोणतीही लिस्टेड कंपनी असे खूप कमी वेळा करते. एवढेच नाही तर अमेरिकेची शेअर बाजार नियंत्रक ‘सिक्योरिटी अँड एक्सचेंज कमीशन’ कंपनीवर कारवाई करण्याची शक्यता आहे. कारण असे चुकीची वक्तव्ये पसरविल्याने कंपनीच्या शेअरवर परिणाम होण्याची शक्यता आहे. धक्कादायक म्हणजे या एप्रिल फूल न्यूजमुळे कंपनीचे शेअर 5 टक्क्यांनी वधारले होते.