वर्ष संपता संपताच मारुतीचा मोठा धमाका! नव्या अंदाजात सादर केली खिशाला परवडणारी कार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 12:13 PM2022-12-31T12:13:54+5:302022-12-31T12:15:26+5:30
ऑटो एक्सपर्ट या कारला हॅचबॅकच मानते. पण कंपनीने या कारला आपल्या अधिकृत वेबसाइटवर एसयूव्ही सेक्शनमध्ये जागा दिली आहे.
वर्ष 2022 आता संपत आले आहे. यातच मारुती सुझुकीने आपली प्रसिद्ध कार S-Presso नव्या अंदाजात सादर केली आहे. कंपनीने आपल्या या कारचे फोटोदेखील आधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत. ही एक लिमिटेड अॅडिशन एस-प्रेसो कार आहे. जी तिच्या टॉप मॉडेलवर बेस्ड असण्याची शक्यता आहे. अभी इस कार से जुड़े कुछ डिटेल्स सामने आए हैं और बहुत जल्द ही इसकी कीमत का भी खुलासा किया जाएगा.
नवी Maruti S-Presso Xtra मध्ये काय आहे खास -
ऑटो एक्सपर्ट या कारला हॅचबॅकच मानते. पण कंपनीने या कारला आपल्या अधिकृत वेबसाइटवर एसयूव्ही सेक्शनमध्ये जागा दिली आहे. सध्या, नव्या S-Presso Xtra मध्ये काही एक्स्ट्रा फीचर्स आणि अपडेट येणे अपक्षित आहे. हिचा फोटो पाहून अंदाज लावला जाऊ शकतो, की हिच्या एक्सटीरिअरमध्ये फ्रंट स्किड प्लेट, डोर क्लॅडिंग, व्हील आर्क क्लॅडिंग सारखे अपग्रेड दिसू शकतात. याशिवाय, हिच्या इंटीरिअरमध्ये डोर पॅनल आणि डॅशबोर्ड इत्यादीवर रेड इंसर्ट देण्यात येईल. कंपनी हिच्या अपहोल्स्ट्री आणि मॅट्समध्येही बदल करेल.
या कारच्या इंजिन मेकॅनिझममध्ये कुठल्ही बदल होणार नाही. या कारमध्येही स्टँडर्ड मॉडेल प्रमाणेच 1.0-लिटरचे के-सीरीज ड्युअल-जेट इंजिन असेल. हे इंजिन आयडियल स्टॉर्ट-स्टॉप टेक्नॉलॉजीसह येते. हे इंजिन 65.7 bhp ची पॉवर आणि 89 Nm चा टॉर्क जेनरेट करेल. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सला जोडले गेले आहे. येणाऱ्या काळात ही कार (AGS) ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्येही उपलब्ध असेल.
महत्वाचे म्हणजे, हिचे स्टँडर्ड मॉडेल पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही व्हेरिअँटमध्ये उपलब्ध आहे. हिचे पेट्रोल मॉडेल 21.4 किलोमीटर प्रतिलीटर तर सीएनजी मॉडेल 32.73 किलोमीटर प्रतिकिग्रॅपर्यंत मायलेज देते. रेग्युलर मॉडेलमध्ये 7 इंचाचे ट्च स्क्रिन इंफोटेंमेन्ट सिस्टिम, डिजिटल इंस्ट्रूमेन्ट क्लस्टर, पॉवर विंडो, किलेस एंट्री सारख्या सुविधा मिळतात. याशिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीने या कारला डुअल एअरबॅग, रिअर पार्किंग सेंसर, स्पीड अलर्ट सिस्टिम, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD) तसेच, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS) आणि फ्रंट सीट-बेल्ट रिमाइंडर देण्यात आले आहे.
अशी असेल किंमत -
सध्या Maruti S-Presso Xtra च्या किंमतीसंदर्भात काहीही सांगणे अवघड आहे. मात्र, नव्या अपग्रेडनंतर, या कारची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा अधिक असू शकते, असा अंदाज बांधला जात आहे. सध्याच्या मॉडेलची किंम 4.25 लाख रुपयांपासून ते 6.10 लाख रुपयांपर्यंत जाते. ही कार बाजारात प्रामुख्याने टाटा टिअॅगो आणि रेनो क्विड सारख्या मॉडेल्सना टक्कर देईल.