सायकल चोरी झाली म्हणून YouTube वर शिकून बनवली Anti-Theft E-Cycle
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 03:19 PM2022-04-19T15:19:30+5:302022-04-19T15:24:37+5:30
Anti-Theft E-Cycle Innovation : या सायकलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कोणीतरी चोरण्याचा प्रयत्न करताच, सायकल मालकाच्या फोनवर मेसेजसह अलार्म अॅक्टिव्हेट होईल.
नवी दिल्ली : टॅलेंटला कोणत्याही पदवीची गरज नसते. सामान्य लोकही अनेकदा असे काम करतात, ज्याचा जगाला अभिमान वाटतो. असाच काहीसा प्रकार आसाममधील (Assam) करीमगंज येथील रहिवासी सम्राट नाथ याने केला असून त्याने थेफ्ट प्रूफ ई-सायकल (Anti-Theft E-Cycle) बनवल्याचा दावा केला आहे. या सायकलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कोणीतरी चोरण्याचा प्रयत्न करताच, सायकल मालकाच्या फोनवर मेसेजसह अलार्म अॅक्टिव्हेट होईल.
बरेच लोक आपले आवडते व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी यूट्यूब ( YouTube) वापरतात. मात्र यूट्यूबवरून मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून 19 वर्षीय सम्राट नाथ याने बनवलेल्या सायकलची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सायकलवर नियंत्रण ठेवण्यासाठी सम्राटने अॅपही तयार केले आहे. सम्राट दावा करतो की, तो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून त्यावर नियंत्रण ठेवू शकतो.
Assam | Karimganj's Samrat Nath claims to have built a theft-proof e-bike
— ANI (@ANI) April 19, 2022
If anyone tries to steal it then I'll get a message on my phone & alarm will be activated. I've developed an app to control this bike. It can be controlled from anywhere in the world, he says pic.twitter.com/aueaLTRtAD
कल्पना कशी सुचली?
इयत्ता आठवीत शिकत असताना त्याच्या मामाची सायकल चोरीला गेली. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने या चोरीमुळे संपूर्ण कुटुंब हादरले. तेव्हापासून सम्राटाच्या मनात एकच गोष्ट चालू होती की असे डिव्हाइस बनवू, जेणेकरून सायकल चोरीपासून वाचू शकेल. त्यानंतर त्यानंतर आयटीआयमध्ये प्रवेश घेतला आणि या डिव्हाइसवर काम सुरू केले.
शानदार फीचर्स
या खास ई-सायकलचे फीचर्स देखील जबरदस्त आहेत. यामध्ये जीपीएस बसवण्यात आले आहे. ते तीन तासात चार्ज होते. दरम्यान, आपले स्वप्न साकार झाल्यानंतर सम्राट म्हणतो की, एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर सायकल तुम्हाला 60 किलोमीटरपर्यंत थांबू देणार नाही. या अँटी थेफ्ट डिव्हाईसचे (Anti-theft Device) सर्किट बनवण्यासाठी सम्राटला यूट्यूबवर खूप संशोधन केल्यानंतर सुरुवातीचे यश मिळाले होते. त्यासाठी तो कोडिंगही शिकला, पण पैशांची कमतरता त्याच्या यशाच्या मार्गात पुन्हा अडथळा ठरत होती.
यानंतर सम्राटाने मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात काम करून आपल्या शोधासाठी पैसे वाचवण्यास सुरुवात केली. पगारातून मिळालेल्या पैशातून त्याने एक साधी सायकल विकत घेतली आणि तिचे रूपांतर एका विलक्षण अँटी थेफ्ट ई-सायकलमध्ये (Anti-Theft E-Cycle) केले. आता सायकलचे पेटंट घेतल्यानंतर सम्राटला मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायचे आहे. जेणेकरून लोकांना ही उत्तम सायकल परवडणाऱ्या किमतीत बाजारात मिळू शकेल.