फक्त 2 दिवस आहेत शिल्लक, 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर Ola चे टेन्शन वाढवणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 05:56 PM2024-01-04T17:56:15+5:302024-01-04T17:59:00+5:30
Ather कंपनीची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Ather 450 Apex येत्या 6 जानेवारीला ग्राहकांसाठी लाँच केली जाणार आहे.
नवी दिल्ली : सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric Scooters) मागणी झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर एथर (Ather) कंपनी नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. Ather कंपनीची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Ather 450 Apex येत्या 6 जानेवारीला ग्राहकांसाठी लाँच केली जाणार आहे.
Ather ची S सीरीजमध्ये येणारी ही नवीन स्कूटर कंपनीच्या सध्याच्या Ather 450X आणि Ather 450S या मॉडेल्सपेक्षा अधिक पॉवरफुल असणार आहे. Ather 450X मॉडेलच्या तुलनेत Ather 450 Apex मध्ये अधिक पॉवरफुल मोटर दिली जाऊ शकते. जर कंपनीने आपल्या नवीन मॉडेलमध्ये खरंच पॉवरफुल मोटर दिली तर त्याचा सर्वात मोठा फायदा स्कूटरच्या परफॉर्मेंस आणि स्पीडमध्ये दिसून येईल.
कंपनीने निःसंशयपणे हे नवीन मॉडेल आपल्या अधिकृत साइटवर सूचीबद्ध केले आहे, परंतु आतापर्यंत या स्कूटरबद्दल काहीही माहिती उघड केली नाही. या आगामी स्कूटरबाबत आत्तापर्यंत आलेल्या रिपोर्ट्समध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, या स्कूटरचा टॉप स्पीड 100 किमी प्रतितास असेल आणि ही स्कूटर केवळ 3 सेकंदात 0 ते 40 पर्यंत वेग वाढवेल. त्यामुळे आगामी काळात ही बाईक ओला स्कूटरला टक्कर देऊ शकते.
बॅटरी
450 एक्स मॉडेलप्रमाणे या आगामी इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.7 kWh बॅटरी देखील दिली जाऊ शकते. या स्कूटरमध्ये इको, राइड, स्पोर्ट आणि Warp+ राइडिंग मोड असतील, यासंदर्भात कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खुलासा झाला आहे.
कधी सुरु होणार डिलिव्हरी?
Ather Energy च्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीवरून असे समोर आले आहे की, तुम्ही 2500 रुपये बुकिंग रक्कम भरून ही स्कूटर बुक करू शकता. याशिवाय मार्च 2024 मध्ये ग्राहकांना स्कूटरची डिलिव्हरी सुरू होईल.
किती असेल किंमत?
Ather 450 एक्स प्रो मॉडलची किंमत 1.67 लाख रुपये (एक्स-शोरूम, बंगलुरु) आहे. तर या प्रो मॉडलपेक्षा Ather ची आगामी इलेक्ट्रिक स्कूटर महाग असणार आहे. दरम्यान, सध्या कंपनीने अॅपेक्स मॉडेलच्या किंमतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.