Ather 450X Base Model: १ लाखापेक्षा कमी किंमतीत Ather इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; पाहा किंमत, मिसिंग फीचर्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 04:02 PM2023-04-15T16:02:58+5:302023-04-15T16:03:36+5:30

Ather 450X Base Model: एथर ४५० सीरिजमध्ये एक नवं व्हेरिअंट लाँच करण्यात आलं आहे. या मॉडेलची किंमत एक लाखांपेक्षा कमी आहे.

Ather 450X Base Model Ather Electric Scooter Launched Under Rs 1 Lakh See price missing features pro cons | Ather 450X Base Model: १ लाखापेक्षा कमी किंमतीत Ather इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; पाहा किंमत, मिसिंग फीचर्स 

Ather 450X Base Model: १ लाखापेक्षा कमी किंमतीत Ather इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; पाहा किंमत, मिसिंग फीचर्स 

googlenewsNext

Ather 450X Base Model: एथर एनर्जीनं (Ather Energy) भारतीय बाजारात आपली परवडणारी इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली आहे. ही स्कूटर Ather 450X चं बेस व्हेरिअंट आहे. या इलेक्ट्रीक स्कूटरची किंमत एक लाखांपेक्षा कमी आहे आणि याद्वारे कंपनी ओला एस1 आणि ओला एस1 एअर ग्राहकांना आकर्षित करू इच्छित आहे. Ather 450X सीरिज स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 98,183 ते 1.28 लाखांदरम्यान आहे. दरम्यान, या स्कूटरच्या बेस व्हेरिएंटमध्ये अनेक फीचर्स उपलब्ध नाहीत, जी टॉप व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहेत. पाहूया काय आहे या नव्या स्कूटरमध्ये.

एथर एनर्जीनं 450X इलेक्ट्रीक स्कूटरचं बेस मॉडेल 98,079 रुपयांमध्ये (एक्स-शोरूम) लाँच केलं आहे. या मॉडेल लाइनअपसह प्रोपॅक देखील ऑफर करण्यात आला आहे आणि ज्यांना आपल्या स्कूटरमध्ये ते बसवायचे आहे त्यांना 30,000 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. या पॅकेजमध्ये फास्ट चार्जिंगसह अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. आता Ather 450X च्या बेस वेरिएंटच्या फीचर्स बाबत सांगायचं झालं तर त्यात अनेक फीचर्स काढण्यात आली आहेत. जीपीएस नेव्हिगेशन, राइड मोड्स, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, लाइव्ह ट्रॅकिंग, हिल होल्ड असिस्ट आणि पार्क असिस्ट यांसारखे फीचर्स त्यात मिळत नाहीत. याशिवाय त्यात ओटीए अपडेट्सदेखील मिळणार नाहीत.

किती असेल रेंज?
Ather 450X च्या बेस व्हेरिएंटमध्ये 7-इंचाचा टचस्क्रीन मिळतो, परंतु त्यात बेसिक ग्रेस्केल इंटरफेस आहे. टॉप व्हेरियंटमध्ये मल्टी कलर डिस्प्ले उपलब्ध आहे. एथरच्या या स्वस्त स्कूटरमध्ये सिंगल राइड मोड उपलब्ध आहे. याशिवाय यात 3.7kWh ची बॅटरी पॅक देण्यात आली आहे. फुल चार्जनंतर ही स्कूटर 146km ची रेंज देऊ शकते. ही इलेक्ट्रीक स्कूटर 6.4kW ची पिकअप पॉवर आणि 26Nm चा टॉर्क जनरेट करते. 90kmph चा टॉप स्पीड असलेली ही इलेक्ट्रीक स्कूटर पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 15 तासांपेक्षा जास्त वेळ घेते. म्हणूनच कंपनी यामध्ये प्रोपॅक देत आहे, ज्यामध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा मिळेल.

Web Title: Ather 450X Base Model Ather Electric Scooter Launched Under Rs 1 Lakh See price missing features pro cons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.