अधिक रेंज, दमदार फीचर्स; Ather नं लाँच केली जबरदस्त Electric Scooter
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 03:35 PM2022-07-20T15:35:59+5:302022-07-20T15:36:26+5:30
मंगळवारी कंपनीनं भारतीय बाजारपेठेत ही स्कूटर लाँच केली आहे.
Ather Energy ने अखेर भारतात 450X Gen3 स्कूटर लाँच केली आहे. ही 450X इलेक्ट्रीक स्कूटरचं लाँग रेंज व्हर्जन आहे. ही स्कूटर सिंगल चार्जवर 146km पर्यंत प्रवास करू शकते. स्कूटरमध्ये 3.7kWh बॅटरी पॅक आणि 6kW इलेक्ट्रीक मोटर देण्यात आली आहे.
Ather Energy ने 2016 मध्ये प्रथमच S340 सह भारतीय बाजारपेठेत आपली एन्ट्री केली होती. कंपनीने 23 हून अधिक शहरांमध्ये स्वतःचे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर देखील सुरू केले आहे. 450X Gen3 ही स्कूटर 3.7kWh च्या मोठ्या बॅटरी पॅकसह येते.
काय असतील फीचर्स?
Ather 450X Gen3 मध्ये ऍप्रॉन-माउंटेड LED हेडलाइट, फ्लॅट फूटबोर्ड, फ्लश-फिटेड साइड स्टँड, डिझायनर मिरर, स्टेप-अप सीट्स आणि LED टेललॅम्प देण्यात आले आहेत. याशिवाय 12-इंचाचे MRF कंपनीचे टायर, 7.0-इंच कलर TFT टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह ब्लूटूथ आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हीटीही यात देण्यात आली आहे. 450X Gen3 मध्ये 6kW PMS इलेक्ट्रीक मोटर मोठ्या 3.7kWh, IP67-रेटेड लिथियम-आयन बॅटरी पॅकशी जोडलेली आहे. हे एका चार्जवर 146 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते.
सेफ्टी आणि किंमत
सुरक्षिततेच्या दृष्टीने, Ather 450X ला कंबाइंड ब्रेकिंग सिस्टम (CBS) देण्यात आले आहे. तसंच यात इको, राइड, स्पोर्ट आणि रॅप हे चार रायडिंग मोड्सही मिळतात. याशिवाय मागील बाजूस डिस्क ब्रेक देखील देण्यात आला आहे. स्कूटरला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मोनो-शॉक युनिट देखील मिळते. या स्कूटरची एक्स शोरून दिल्ली किंमत 1.39 लाख रूपये असून ही डिलरशीपद्वारे किंवा ऑनलाइनही बुक करता येऊ शकते.