Ather Energy: दिल बडा होना चाहिए! एथरने दुसऱ्या कंपन्यांच्या इ-स्कूटरसाठी फास्ट चार्जरचा पेटंटच खुला केला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 05:06 PM2021-08-10T17:06:04+5:302021-08-10T17:06:46+5:30

Ather Energy won hearts: अन्य स्कूटर चालकांना एथरच्या फास्ट चार्जिंग स्टेशनचाही वापर करता येणार आहे. एथर एनर्जीची 200 हून अधिक सेंटर आहेत. यामुळे सर्व कंपन्यांना एकसारखे जसे की मोबाईलचे चार्जर, सॉकेट आणि पिन असते तसा चार्जर बनविण्य़ाच्या दिशेने पुढे नेणार आहे.

Ather Energy wants the same charger for all electric two-wheelers, opens its patents for all | Ather Energy: दिल बडा होना चाहिए! एथरने दुसऱ्या कंपन्यांच्या इ-स्कूटरसाठी फास्ट चार्जरचा पेटंटच खुला केला

Ather Energy: दिल बडा होना चाहिए! एथरने दुसऱ्या कंपन्यांच्या इ-स्कूटरसाठी फास्ट चार्जरचा पेटंटच खुला केला

googlenewsNext

इलेक्ट्रीक स्कूटर (Electric Scooter) निर्माता कंपनी एथर एनर्जीने मंगळवारी मोठी घोषणा केली आहे. अन्य कंपन्यांच्या इलेक्ट्रीक स्कूटरसाठी आपला फास्ट चार्जिंग कनेक्टर देण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे इलेक्ट्रीक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन मिळेल, सोबत इलेक्ट्रीक स्कूटर फास्ट चार्ज होऊ शकतील. एथरचा (Ather Energy) फास्ट चार्जिंग कनेक्टर (Fast-Charging Connector) वापरून इलेक्ट्रीक स्कूटरला कमी वेळात फुल चार्ज केले जाऊ शकते. महत्वाची बाब म्हणजे याचे पेटंटही एथरने उपलब्ध केले आहेत. (Ather Energy Opens its Fast-Charging Electric Scooter Connector for Other EV Makers)

यामुळे अन्य स्कूटर चालकांना एथरच्या फास्ट चार्जिंग स्टेशनचाही वापर करता येणार आहे. एथर एनर्जीची 200 हून अधिक सेंटर आहेत. यामुळे सर्व कंपन्यांना एकसारखे जसे की मोबाईलचे चार्जर, सॉकेट आणि पिन असते तसा चार्जर बनविण्य़ाच्या दिशेने पुढे नेणार आहे. एकसारखे युनिव्हर्सल चार्जर बनविल्यास प्रत्येक कंपनीला त्यांचे त्यांचे किंवा सार्वजनिक चार्जिंग सेंटवर वेगवेगळे चार्जर प्रणाली बसविण्याची झंझट संपणार आहे. तसेच गुंतवणूकही वाचणार आहे. 

एथरने बनविलेल्या कनेक्टरसोबत एका कॉम्बो एसी आणि डीसी चार्जिंग ऑफर केले जाणार आहे. हा चार्जर अशाप्रकारे डिझाईन करण्यात आला आहे की, तो CAN 2.0 क्षमतेच्या दुचाकी आणि तीन चाकींना वापरता येणार आहे. महत्वाचे म्हणजे हा कनेक्टर कमी खर्चात तयार करण्यात आला आहे. 

एथर एनर्जीनुसार चाडेमो, सीसीएस सारख्या इलेक्ट्रीक कारसाठी जागतिक मानक आहे. परंतू चीन सोडला तर अन्य कोणत्याही देशात दुचाकींच्या फास्ट चार्जिंगसाठी कोणताही अनुकूल असा मानक उपलब्ध नाही. यामुळे हा कनेक्टर त्यावर उपाय ठरणार आहे. एका चांगले चार्जिंगइन्फ्रास्ट्रक्चर उभे राहिले तर ईव्हींचा खप वाढेल.

Web Title: Ather Energy wants the same charger for all electric two-wheelers, opens its patents for all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.