एथरने किंमती १०,००० नी घटविल्याचे सांगितले, पण 'रंग' दाखविला; घोडे-भाडे तेच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 17:39 IST2025-01-21T17:36:47+5:302025-01-21T17:39:04+5:30
Ather Rizta Discount: एथरने नुकतेच त्यांच्या स्कूटरच्या किंमती १० हजार रुपयांनी कमी करण्याचे जाहीर केले होते. परंतू, ते एक आमिष असल्याचे समोर येत आहे.

एथरने किंमती १०,००० नी घटविल्याचे सांगितले, पण 'रंग' दाखविला; घोडे-भाडे तेच...
- हेमंत बावकर
सध्या बाजारात इलेक्ट्रीक स्कूटरची चलती आहे. बजाज चेतक, ओला या कशाही असल्या तरी पहिल्या पाचात आहेत. टीव्हीएसच्या ईलेक्ट्रीक स्कूटरची तशी चर्चा नसली तरी या स्कूटरने दुसरा क्रमांक पटकावला आहे. ओला तिसऱ्या क्रमांकावर असून एथर ही कंपनी चौथ्या क्रमांकावर आहे. आता एथरने नुकतेच त्यांच्या स्कूटरच्या किंमती १० हजार रुपयांनी कमी करण्याचे जाहीर केले होते. परंतू, ते एक आमिष असल्याचे समोर येत आहे.
एथरची रिझ्टा ही फॅमली स्कूटरची एक्स शोरुम किंमत कंपनीने गेल्याच आठवड्यात १.०९ लाखांवरून ९९ हजार रुपये केली आहे. परंतू, असे करताना कंपनीने २०२५ च्या स्कूटरवर कलरनुसार पैसे वाढविले आहेत. म्हणजे, एक-दोन महिन्यांपूर्वी ज्या ग्राहकांनी एथर रिझ्टा खरेदी केली, तेवढ्याच किंमतीला १० हजार रुपयांचा डिस्काऊंट असलेली स्कूटर मिळत आहे.
ओलाने काही महिन्यांपासून बॉस सेल जाहीर केला होता. कस्टमर तुटून पडले होते. पण तिथे गेल्यावर समजले बॉस सेलमध्ये स्कूटर कोणालाच मिळत नाहीय, आहे त्याच किंमतीला ती खरेदी करावी लागतेय. तसाच हा प्रकार आहे. एथरने एकडून तिकडून किंमत फिरवून तेवढीच ठेवली आहे. फक्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक्स शोरुमच्या किंमतीत बदल केला आहे.
कलरसाठी पैसे मोजा...
एथरने कलरसाठी पैसे मोजण्यास ग्राहकांना बांधिल केले आहे. मोनोटोन म्हणजेच एकच कलर असेल तर एवढे पैसे, ड्युअल टोन कलर हवा असेल तर त्यापेक्षा जास्त आणि मॅट निळा कलर हवा असेल तर त्यापेक्षा जास्त पैसे आकारले जात आहेत. २०२४ मध्ये कलरसाठी पैसे आकारले जात नव्हते. ते आता एक्स शोरुम किंमतीत कमी करून इकडून काढण्यात येत आहेत. तसेच प्रो पॅकमध्ये १००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.